District Development Plan : जिल्हा विकास आराखड्यासाठी सोमवारपर्यंत माहिती सादर करा

Latest Marathi News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे.
Kumar Ashirwad
Kumar AshirwadAgrowon
Published on
Updated on

Solapur News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. यामध्ये राज्यांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने प्रत्येक जिल्ह्याला विकास आराखडा सादर करण्याचे सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सोमवारपर्यंत (ता.११) माहिती सादर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केल्या आहेत.

नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास आराखडा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पुनर्वसन अधिकारी समाधान टोम्पे, उपस्थित होते.

Kumar Ashirwad
Solapur Onion Issue : सोलापुरात ‘जनहित’कडून कांदा लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, या विकास आराखड्याच्या माध्यमातून केवळ अर्थसंकल्प कार्यक्रम आणि खर्चाच्या पारंपारिक संकल्पनेच्या पलीकडे जाऊन जिल्ह्याला गुंतवणुकीचे केंद्र अशी ओळख करून देणे अपेक्षित असून यामध्ये सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेऊन त्वरित आराखडे सादर करावेत.

Kumar Ashirwad
Solapur APMC : मार्केट यार्डातील शेतमाल अडत बाजार ओस

जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक नियोजन व अंलबजावणी आराखडा तयार करावयचा असून यामध्ये कृषी व संलग्न सेवा, उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यटन क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी आवश्यक त्या कार्यप्रणालीचा या आराखड्यामध्ये समावेश आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय समितीकडे १५ सप्टेंबरला सादरीकरण

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी यापूर्वी जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठका झाल्याची माहिती आराखड्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले जिल्हा समन्वयक पंकज क्षीरसागर यांनी दिली.

१५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय समितीला जिल्हास्तरीय समितीचा जिल्हा विकास आराखडा सादर करावयाचा असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी त्वरित आपापल्या विभागाचे आराखडे जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याच्या क्षीरसागर यांनी केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com