Assam Flood : आसाममध्ये १३ जिल्ह्यांतील ५६४ गावांना पुराचा फटका; ५ लाखांहून अधिक लोक प्रभावित, १४ जणांचा मृत्यू

Assam Flood Update : आसाममध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे १३ जिल्ह्यांतील ५६४ गावे बाधित झाली आहेत. येथे ५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Assam Flood
Assam FloodAgrowon

Pune News : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून पुराचा फटका १३ जिल्ह्यातील ५६४ गावांना बसला आहे. येथे ५ लाखांहून अधिक लोकांना पुरामुळे स्थलांतरीत व्हावे लागले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरामुळे आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पुरावर स्थानिक प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. बचाव आणि मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने बाधित जिल्ह्यांमध्ये १९३ मदत शिबिरे आणि ८२ मदत वितरण केंद्र उभारली आहेत.

देशाच्या विविध भागात मॉन्सूनने पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. आसाम राज्यात देखील मॉन्सून जोरदार बरसत आहे. यामुळे येथे पुराची स्थिती निर्माण झाली असून गुवाहाटी, गोलपारा आणि धुबरीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. कोपिली, बराक, धनसिरी, बुऱ्हिडीहिंग, गौरांग, कुशीयारा नद्यांची पाणीपातळीही वाढत आहे. गेल्या २४ तासांत आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील पुरामुळे मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. कचरमध्ये दोन आणि नागाव जिल्ह्यात एकाचा मृत्यू पुरामुळे झाला. कचार जिल्ह्यात एक व्यक्ती आणि एक मूल अद्याप बेपत्ता आहे.

Assam Flood
Afghanistan Floods : अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस, ६८ जणांचा मृत्यू; ३०० हून अधिक जनावरेही दगावली

अनेक रेल्वे गाड्या रद्द

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने हैदोस घातला असून पुराच्या पाण्याने रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. येथे न्यू हाफलांग-चंद्रनाथपूर सेक्शन दरम्यान रेल्वे ट्रॅक खराब झाला आहे. त्यामुळे ईशान्य फ्रंटियर रेल्वेने या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करत काही अंशतः रद्द केल्या आहेत.

रविवारी पूरस्थितीत थोडी सुधारणा

आसाममध्ये गेल्या दोन दिवसांत पुराणे जनजीवन विस्कळीत केले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार पुरामुळे १४ जिल्ह्यांमध्ये ५ लाख ३५ हजार २४६ लोक प्रभावित झाले आहेत. २८ मे पासून आतापर्यंत मृतकांची संख्या १४ वर गेली असून काही लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अनेक प्रमुख धरणांची दरवाजे खुली

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, शनिवारी प्रभावित लोकांची संख्या ६ लाखांच्या वर होती. मात्र रविवारी यात घट झाली. सध्या ब्रह्मपुत्रा आणि बराकसह प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीच्या खाली वाहत असून अनेक प्रमुख धरणांची दरवाजे खुली करण्यात आली आहेत.

Assam Flood
Kolhapur Flood : अलमट्टीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक, कृती समितीचे निवेदन

१४ जिल्हे पूरग्रस्त

तर आसामध्ये आलेल्या पुराचा फटका हैलाकांडी, करीमगंज, होजाई, धेमाजी, कामरूप, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कचार, दक्षिण सलमारा, कार्बी आंगलाँग पश्चिम, गोलाघाट आणि दिमा-हसाओ या जिल्ह्यांना बसला आहे.

पियुष हजारिका यांनी भेट दिली

आसामचे जलसंपदा मंत्री पियुष हजारिका यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी सांगितले की, "पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पुर्नवसनाचे काम सध्या सुरू आहे. आम्ही पीडितांना आवश्यक ती मदत करत आहोत आणि ज्या भागात विध्वंस झाला आहे त्यांची त्वरीत दुरुस्ती केली जात आहे."

अमित शाहांनी घेतला आढावा

दरम्यान गृहमंत्री अमित शाहा यांनी शनिवारी आसाम मधील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच शाहा यांनी पुरेशा मदतीचे आश्वासन दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com