Afghanistan Floods : अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस, ६८ जणांचा मृत्यू; ३०० हून अधिक जनावरेही दगावली

Afghanistan Floods News : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा पुरामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील पश्चिमेकडील घोर प्रांतात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ६८ जनांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता आहेत.
Afghanistan Floods
Afghanistan FloodsAgrowon

Pune News : अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात शुक्रवारी (ता.१७) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराने विध्वंस केला आहे. येथे आलेल्या पुरामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेघर झाली आहेत. तर अनेकांचे प्रियजन या पुरात वाहून गेल्याचे तालिबानच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले आहे. तसेच या अधिकाऱ्याने मृतांची संख्या वाढू शकते असेही सांगितले आहे. यावेळी घोर प्रांत गव्हर्नरचे प्रवक्ते अब्दुल वाहिद हमास यांनी सांगितले की, घोर प्रांतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुसकान झाले आहे. येथे जीवित हाणीसह मालमत्ता आणि जमिनीचे नुकसान झाले असून ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक बेपत्ता आहेत. येथे असामान्य पाऊस झाला असून ३०० हून अधिक जनावरे दगावली आहेत.

याबरोबरच हमास यांनी सांगितले की, घोरला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून २,५०० कुटुंबे बाधित झाली आहेत. पुरामुळे पश्चिम फराह, हेरात आणि दक्षिणेकडील झाबुल आणि कंदाहार प्रांताला फटका बसला आहे. येथे देखील २ हजार घरे, तीन मशिदी आणि चार शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच ४ हजार घरांचे अंशत: नुकसान झाले असून २ हजारांहून अधिक दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत.

Afghanistan Floods
Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पूर आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांचेही तुकडे झाले आहेत. प्रांतीय राजधानी फिरोज-कोहमध्ये मोठे नुकसान झाले असून जीवितसह वित्त आणि पशूधनाचे नुकसान झाले असे माहिती विभागाचे प्रमुख मौलवी अब्दुल है झैम यांनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यात उत्तर अफगाणिस्तानातील गावे उद्ध्वस्त झाली होती. येथे ३१५ जनांचा मृत्यू झाला होता. तर १६०० हून अधिक जखमी झाले होते.

हेलिकॉप्टर अपघात

दरम्यान BBC मध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी घोर प्रांतात नदीत पडलेल्या लोकांचे मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या अफगाण हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. तांत्रिक समस्यांच्या कारणाने ते हेलिकॉप्टर कोसळले. ज्यात एक ठार झाला आणि १२ जण जखमी झाले होते.

Afghanistan Floods
Flood Condition : संयुक्त अरब अमिरातीत मुसळधार पावसामुळे पूर

नैसर्गिक आपत्तींचा धोका

अफगाणिस्तानला नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण झाला असून गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी हवामान बदलाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील देशांपैकी एक अफगाणिस्तानला मानले आहे. २०२१ मध्ये परदेशी सैन्याने देश सोडल्यानंतर तालिबान सत्तेवर आल्यापासून, येथे विकास मदत कमी झाली आहे. तर मदतीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

बागलान प्रांतात हजारो लोक बेघर

या पुरामुळे सर्वाधिक फटका हा उत्तरेकडील बागलान प्रांताला बसला असून येथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. पुरानंतर हजारो लोक बेघर झाले असून त्यांच्या त्यांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय उपचारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावरून यूएएन वर्ल्ड फूड प्रोग्रामने म्हटले आहे की, पुरामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २ हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तर अफगाणिस्तानातील बागलान राज्यातील पाच जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

परिचारिका, पॅरामेडिक्स आणि डॉक्टर

रोझातुल्लासह अन्य १५ परिचारिका, पॅरामेडिक्स आणि डॉक्टर्स हे प्रभावित भागात पोहोचले असून त्यांच्याकडून जखमी लोकांना मदत पोहचवली जात आहे. येथे २०० हून अधिक लोकांवर उपचार सुरू असून एकाच कुटुंबातील १६ सदस्य गमावलेल्या व्यक्तीचा समावेश आहे

शेताला गाळाच्या तलावाचे स्वरूप

गदन बाला गावात आलेल्या पूरामुळे शेतांना गाळाच्या तलावाचे स्वरूप आले असून शेकडो एकर शेतातील कापूस, गहू पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. जोरदार पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहाने हिरवीगार पिके उखडून टाकली असून आता शेतात फक्त चिखल उरला आहे.

(सोर्स : दैनिक जागरण, आज तक आणि BBC चे वृत्त)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com