Drought Condition : 'जळगावा'त ५६० गावे दुष्काळाच्या गर्तेत

Maharashtra Drought Update : राज्य शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर केला असला, तरी इतर तीन तालुकेही दुष्काळाच्या छायेत आहेत.
Drought Condition
Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा झालेला ८५ टक्के पाऊस, त्यातही पावसाची दीर्घकाळ विश्रांती यामुळे खरिपाच्या पिकांचे उत्पादन घटले आहे. राज्य शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर केला असला, तरी इतर तीन तालुकेही दुष्काळाच्या छायेत आहेत.

एकूण ५६० गावे दुष्काळाच्या गर्तेत असून, जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करण्याच्या कामास वेग घेतला आहे. जी गावे शासनाच्या दुष्काळाच्या यादीत नाहीत, तेथे काय सुविधा देता येतील, यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात ‘अल निनोमुळे’ यंदा जूनच्या शेवटी पाऊस सुरू झाला. जुलैत पेरण्या योग्य पाऊस झाला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्टमध्ये तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस चांगला झाल्याने खरिपाला जीवदान मिळाले. पाऊस कालावधीत जळगाव जिल्ह्यात अवघा ८८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील तालुक्यांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.

Drought Condition
Drought Crisis : सोयाबीन नाहीच; कपाशीलाही आठ-दहा बोंड

पाणी पातळीत घट

जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात आले. यात चाळीसगाव तालुक्यातील भूजल पातळी ही दीड मीटरने घटल्याचा अहवाल देण्यात आला होता.

दुष्काळाची परिस्थितीत दर्शविणारी सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६० गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत असल्याने ही गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचे मानले जात आहे.

Drought Condition
Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्यात सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

अंतिम पैसेवारीनंतर परिस्थिती स्पष्ट

जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नजर, सुधारित, अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. १५ सप्टेंबरला नजर पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात चाळीसगाव तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत होती. आता ३१ ऑक्टोबरला प्रशासनाकडून सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यात यंदा तब्बल ५६० गावे ही दुष्काळाच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील ९४३ गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर असल्याने ही गावे दुष्काळापासून सध्यातरी दूर आहेत. ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील ५६० गावे दुष्काळाच्या छायेत आहे. जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे. पाण्याचे टँकर लागलीच सुरू करण्यात आहेत. शासनाकडून तूर्त चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. इतर तीन तालुक्यांतील दुष्काळाबाबत अभ्यास सुरू आहे.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com