Agristack Yojana : पालघर जिल्ह्यातील गावागावांत ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यावर भर

Agriculture Scheme : शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
Farmer ID
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Palghar News : शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना शासन राज्यात राबवत आहे.

तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ला आधार लिंक करून फार्मर आयडी बनवून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय आणि कृषी विभाग यांनी गावोगावी फार्मर आयडी कॅम्प राबवत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना या योजनेतून आधार कार्डसारखे स्वतःचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी शासकीय कामासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. फार्मर आयडी बनवून घेण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने मुदतीपूर्वी बनवून घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Farmer ID
Agristack Yojana : ‘ॲग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना मिळणार जलद आणि अचूक सुविधा

तहसीलदार डहाणू, गटविकास अधिकारी डहाणू आणि डहाणू तालुका कृष अधिकारी यांच्याकडून सर्व शेतकरीबांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, फार्मर आयडी तयार करून घेण्यासाठी गावातील सीएससी सेंटर किवा कॅम्पमध्ये जाऊन आपला ७/१२ व आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा.

मोहिमेला सुरुवात

डहाणूत कृषी विभाग, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती यांच्यामार्फत तालुक्यातील विविध ठिकाणी फार्मर आयडी बनवून घेण्याचे कॅम्प घेण्यात आले आहेत.

Farmer ID
Agristack Yojana : विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक

ओळखपत्रात काय?

ओळखपत्रात जमिनीची माहिती, पेरणी, जनावरांची माहिती, योजनांच्या लाभाची नोंद आदी असणार आहे. सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्रीस्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक प्रोग्रामअंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.

फार्मर आयडी नोंदणी करण्याची अंतिम मुद्दत ३१ मार्च आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा, जेणेकरून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com