Electricity Transformer
Agriculture ElectricityAgrowon

Agriculture Electricity : कोकणगाव, करंजगाव उपकेंद्रात ट्रान्स्फॉर्मरसाठी साडेपाच कोटी

Electricity Transformer : शेतकऱ्यांना येणारी अडचण लक्षात घेऊन आमदार बनकर यांनी तत्कालीन व विद्यमान ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
Published on

Nashik News : निफाड तालुक्यातील कोकणगाव, भेंडाळी, करंजगाव या ३३/११ केव्ही उपकेंद्रामध्ये अतिरिक्त पाच एमव्हीए ट्रान्स्फॉर्मर उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी ४८ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

निफाड तालुक्यातील कोकणगाव, भेंडाळी, करंजगाव या ३३/११ केव्ही ठिकाणी कार्यरत ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर अतिभारीत असल्याने वारंवार ट्रीप होणे, अनेकदा नादुरुस्त होणे या कारणांमुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीपिकांना पाणी देणे, जनावरांना पाणी अशा अनेक अडचणींचा सामाना करावा लागत होता.

Electricity Transformer
Agriculture Electricity : मंजूर ‘ट्रान्स्फॉरमर’चे घोडे अडले कुठे?

शेतकऱ्यांना येणारी अडचण लक्षात घेऊन आमदार बनकर यांनी तत्कालीन व विद्यमान ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास अखेर आले यश आहे.

Electricity Transformer
Agriculture Electricity : नान्नज, रानमसले परिसरात विजेअभावी पिके धोक्यात

कोकणगाव, भेंडाळी, करंजगाव या ३३/११ के.व्ही. उपकेंद्रामध्ये वाढीव ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी ४८ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

यामध्ये कोकणगाव उपकेंद्रासाठी एक कोटी ८७ लाख, भेंडाळी उपकेंद्रासाठी एक कोटी ७० लाख तर करंजगाव उपकेंद्रासाठी एक कोटी ९० लाख याप्रमाणे निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली. वाढीव ट्रान्सफॉर्मरमुळे निफाडमधील शेतकरी व ग्राहकांच्या विजेच्या समस्या दूर होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com