MGNREGA Wages : ‘रोहयो’च्या थकित मजुरीचा मुद्दा तापला

Rural Employment Scheme : चिखलदरा तालुक्यात रोजगार हमी योजनेची ५० कोटी रुपयांची मजुरी थकीत आहे. आमदार तसेच खासदारांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत आक्रमक भूमिका मांडल्याने हा विषय चांगलाच तापण्याचे संकेत आहेत.
Rural Development
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : चिखलदरा तालुक्यात रोजगार हमी योजनेची ५० कोटी रुपयांची मजुरी थकीत आहे. आमदार तसेच खासदारांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत आक्रमक भूमिका मांडल्याने हा विषय चांगलाच तापण्याचे संकेत आहेत.

होळी अगोदरच आदिवासी मजुरांना मजुरी अदा केल्या गेली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मेळघाटातील मजूर संघटनांनी दिला आहे.

Rural Development
MGNREGA : वीस हजारांहून अधिक मजुरांच्या हाताला काम

अन्यथा आंदोलन

आदिवासी समाजाचा सर्वांत मोठा सण होळी आहे. अशा वेळी काम करून सुद्धा गोरगरीब मजुरांचे पैसे मिळत नसतील तर ही लाजीरवाणी बाब आहे. होळीच्या अगोदर मजुरांच्या खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष प्रमोद शनवारे यांनी दिला.

Rural Development
MGNREGA Wages : सातारा जिल्ह्यात 'मनरेगा'च्या मजुरांची १५ कोटींची मजुरी थकली

तत्काळ मजुरी अदा करावी

चिखलदरा तालुक्यातील रोजगार हमी योजनेचा मजुरीचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. अवघ्या १० दिवसांवर होळीचा सण असल्याने शासनाने मजुरांच्या खात्यात तत्काळ मजुरी अदा करावी, असे चिखलदरा तालुक्याचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी सांगितले.

माझ्या विधानसभा क्षेत्रातील आदिवासी मजुरांना होळीपूर्वी त्यांच्या खात्यात मजुरी मिळावी म्हणून रोजगार हमी योजना मंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. होळीपूर्वीच मजुरांच्या खात्यात मजुरी जमा करण्यात येईल.
-केवलराम काळे, आमदार, मेळघाट
जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मेळघाटातील आदिवासी मजुरांचा थकीत मजुरीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
-बळवंत वानखडे, खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com