Farmers Subsidy : प्रोत्साहनपर अनुदानाच्या वंचित लाभार्थ्यांना मिळणार ५० हजार, जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती

Kolhapur Farmers : प्रोत्साहन अनुदानामध्ये देण्यात आलेल्या नियम अटीमुळे अनेक शेतकरी वंचीत राहिले होते.
Farmers Subsidy
Farmers Subsidyagrowon
Published on
Updated on

Maharashtra Agriculture News : राज्य सरकारने नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली, परंतु प्रोत्साहन अनुदानामध्ये देण्यात आलेल्या नियम अटीमुळे अनेक शेतकरी वंचीत राहिले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा गुंतागुंतीची मार्ग अखेर सुटला आहे.

याबाबत कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले की, सहकार विभागाने निश्चित केलेल्या तीन वर्षांपैकी केवळ २०१७-१८ या वर्षातच दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ हजार ४०० इतकी आहे. आठ दिवसांत खात्यावर पैसे राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. शासनाकडून स्पष्टीकरण मिळाल्याने आजच यादी पाठवत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Farmers Subsidy
Kolhapur Irrigation Department : कोल्हापूर जिल्हा ‘सिंचन’ची थकबाकी ११६ कोटी रुपयांची

एकाच वर्षात कर्जाची परतफेडीच्या कोणत्या वर्षातील व एकच वर्षात दोनदा उचल असली तरी त्यातील कोणती रक्कम ग्राह्य धरायची, याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते. त्याचे स्पष्टीकरण काल (ता.२७) शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी मार्ग रिकामा झाला आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त असल्याने एकाच वर्षात दोनदा उचल झाल्याने १४ हजार २८९ शेतकरी अपात्र ठरले होते. यावर शेतकरी संघटनांनी याबाबत जोरदार आंदोलन केल्याने शासनाने निकषात बदल करून एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने मार्ग मोकळा झाला.

पण, काही शेतकऱ्यांनी २०१७- १८ व २०१८-१९, तर २०१८-१९ व २०१९-२० मध्ये उचल व परतफेड केलेल्यांना कोणत्या वर्षातील रकमेचा लाभ द्यायचा? त्याचबरोबर २०१७-१८ या एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड केली असेल व त्यांनी पुढच्या दोन वर्षात उचलच केली नसेल तर कोणती रक्कम ग्राह्य धरायची? असा गुंता सहकार विभागापुढे तयार झाला होता.

याबाबत उपनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते. बुधवारी २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षातील २०१८-१९, तर २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील २०१९-२० वर्षातील रकमेचा लाभ देण्याचे स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com