Agriculture Sowing: शिरूरमध्ये ४७ टक्के पेरण्या पूर्ण

Kharif Sowing Update: पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतीकामांसाठी लगबग वाढली आहे.शिरूर तालुक्यात खरीप पेरणी तसेच मशागतींची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon
Published on
Updated on

Kavathe Yemai News: पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतीकामांसाठी लगबग वाढली आहे.शिरूर तालुक्यात खरीप पेरणी तसेच मशागतींची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तालुक्यात सुमारे ४७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेतशिवारे गजबजली आहेत. वरुणराजाच्या कृपेमुळे उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शिरूर तालुक्यातील बहुतांश भागांत यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तसेच पूर्व मशागत कामांनाही त्याचा मोठा फटका बसला. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी पुन्हा पेरणीत व्यग्र झाले आहेत.

Agriculture Sowing
Kharif Sowing : खरिपाची ५ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी

आतापर्यंत तालुक्यात कडधान्य व तृणधान्य पिकांच्या १२ हजार १६७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच तब्बल ४६.९८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी दिली. बाजरी, मका या तृणधान्य पिकांची पेरणी आठ हजार ९४१ हेक्टरवर पूर्ण झाली आहे. जी सरासरी १५ हजार ३०४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत समाधानकारक आहे.

Agriculture Sowing
Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यात ३४ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणी

कडधान्यांमध्ये तूर, मूग, उडीद, मटकी, वाटाणा, हुलगा, चवळी, वाल, घेवडा या पिकांची सरासरी १० हजार ५९२ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ३ हजार २२७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच पारंपरिक पीक पद्धतीला काहीसा फाटा देत तालुक्यातील तांदळी, मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, वडगाव रासाई, इनामगाव, शिरसगाव काटा या भागांतील शेतकरी कापसाच्या पिकाला पसंती देत आहे. तर टाकळी हाजी, कान्हूर मेसाई, कवठे येमाई, मलठण परिसरातील शेतकरी सोयाबीनकडे वळाले आहेत.

शिरूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने आतापर्यंत कडधान्ये व तृणधान्य पिकांची सरासरी ४६.९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने आणि जमिनीत पुरेशी ओल असल्याने काही ठिकाणी अद्यापही पेरणीची कामे सुरू आहेत. पेरणी स्थिती समाधानकारक असून, शेतकऱ्यांनी आवश्यक त्या मदतीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
सुवर्णा आदक, तालुका कृषी अधिकारी, शिरूर
यंदा मे व जून महिन्यात पाऊस चांगला झाल्याने लवकरच बाजरीची पेरणी केली, तसेच हवामानही पोषक असल्याने चांगले उत्पादन येऊन चांगला बाजारभाव मिळेल.
बाळकृष्ण लंघे, शेतकरी, सविंदणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com