Kasari Dam : शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्याच्या कासारी धरणात ४६.७० टक्के पाणीसाठा

Kasari Dam Kolhapur : शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी देणाऱ्या कासारी धरणात सध्या ४६.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Kasari Dam
Kasari Damagrowon

Kolhapur Kasari Dam Shahuwadi : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वर्षी झालेल्या पावसाने लघू आणि मध्यम धरणे ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने अद्याप पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील काळम्मावाडी आणि राधानगरी या धरणासोबत अनेक धरणांत ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी देणाऱ्या कासारी धरणात सध्या ४६.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कासारी या मध्यम प्रकल्पात १७ एप्रिलअखेर ४६.७० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेने तो ७ टक्के अधिक आहे. उर्वरित पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांत सरासरी ३५ ते ४२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

कासारी नदीवरील सर्वच धरणांतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक असून, यंदा सिंचनासह पिण्यासाठी जूनअखेर पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन केल्याची माहिती पन्हाळा पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी सचिन लाड यांनी दिली आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नादांरी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. कासारी या मुख्य धरणाची पाणीसाठा क्षमता २.७७ टीएमसी आहे.

Kasari Dam
Pre monsoon Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपलं; आंब्याचे नुकसान, भाजीपाला पिकांना दिलासा

या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गार्वाना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी म्हणजे ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. १७ एप्रिलअखेर कासारी (गेळवडे) धरणात ४६.७० टक्के म्हणजे १.२९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी याच दिवशी ४१.०७ टक्के म्हणजे १.१३ टीएमसी पाणीसाठा होता. इतर लुघ प्रकल्पांतील पाणीसाठा असा पडसाळी (३८ टक्के), पोंबरे (४१ टक्के), नांदारी (३५ टक्के), केसरकरवाडी (३६ टक्के), कुंभवडे (४२) असा १७ एप्रिलअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील विविध धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा जिल्ह्यातील सर्वच धरणांत गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असतानाही पन्हाळा पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे जूनअखेर नि कासारी पाणलोट क्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com