Fertilizer Supply : रब्बी हंगामासाठी ४५ हजार टन खत मंजूर

Rabi Season : रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने खते, बी-बियाण्यांचे नियोजन केले आहे. येत्या रब्बी हंगामासाठी ७१ हजार २०० टन खतांची मागणी कृषी आयुक्तालाकडे केली होती.
Fertilizer supply
Fertilizer supply Agrowon

Akola News : रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने खते, बी-बियाण्यांचे नियोजन केले आहे. येत्या रब्बी हंगामासाठी ७१ हजार २०० टन खतांची मागणी कृषी आयुक्तालाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद कृषी विभागाला ४५ हजार ७७० टन खत मंजूर करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून खरीप हंगामाचे सातत्याने नुकसान होत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कीडरोगांमुळे पीक हातातून गेल्याचे प्रकार सुरू आहेत. यंदाही खरिपातील सोयाबीनला पिवळ्या मोझॅकने फटका दिला. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.

Fertilizer supply
Fertilizer Supply : मिश्र खत कंपन्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण

अद्यापही पीक उभे असून किमान २० ते २५ दिवसांनी सरसकट रब्बीसाठी तयारी सुरू होईल. यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. यासाठी एक-दोन पाऊस झाल्यास फायदेशीर ठरू शकते. रब्बीची तयारी लक्षात घेता कृषी विभागाने रासायनिक खतांचे नियोजन केले.

Fertilizer supply
Best Fertilizer : पिकांच्या वाढीसाठी ही खत फायदेशीर ठरतील!

कृषी विभागाकडून ५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४१ हजार ६११ क्विंटल सार्वजनिक, तर १२ हजार १८७ क्विंटल खासगी बियाण्यांचा समावेश आहे.

कृषी विभागामार्फत महाबीजकडे ३६ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, त्यामध्ये २५ हजार क्विंटल हरभरा बियाण्यांचा समावेश असून मंजुरीची अद्याप प्रतीक्षा आहे. ४५ हजार ७७० टन खत मंजूर झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com