Fertilizer Shortage : यंदा रब्बीत पोटॅशचा तुटवडा नसणार

Rabi Season : मागील रब्बी हंगामात फक्त एकाच कंपनीकडून पोटॅशचा पुरवठा झाल्याने टंचाई तयार झाली होती. परंतु यंदा तीन प्रमुख कंपन्यांकडून पोटॅशचा पुरवठा होणार आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : मागील रब्बी हंगामात फक्त एकाच कंपनीकडून पोटॅशचा पुरवठा झाल्याने टंचाई तयार झाली होती. परंतु यंदा तीन प्रमुख कंपन्यांकडून पोटॅशचा पुरवठा होणार आहे. पोटॅश जिल्ह्यात हंगामाअखेरपर्यंत सुमारे ५० हजार टन एवढा उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेतील कृषी विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात पोटॅशची मागणी अधिक असते. केळी पट्ट्यासह भाजीपाला व इतर पिकांना पोटॅशची गरज असते. त्यामुळे त्याचा उठावही असतो. रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या भागात अधिकचा उठाव पोटॅशला असतो. परंतु मागील वेळेस पोटॅशचा ६० टक्केही पुरवठा हंगाम मध्यावर असताना न झाल्याने टंचाई तयार झाली.

Fertilizer
Fertilizer Supply : जळगावात खतपुरवठा विस्कळीतच

ही बाब लक्षात घेता पोटॅशच्या आवश्यकतेनुसार लक्ष्यांकास वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवून घेऊन त्याचा पुरवठाही सुरळीत करून घेतला जाणार असल्याची माहिती माहिती कृषी विभागातील मोहीम अधिकारी विजय पवार यांनी दिली.

यंदा रब्बीसाठी सुमारे ७४ हजार टन युरियाचा पुरवठा होईल. तसेच सिंगल सुपर फॉस्फेटचाही सुमारे २१ हजार टन एवढा पुरवठा होईल.

Fertilizer
Bogus fertilizer : खतामुळे दोनशे एकरांतील पीक उद्ध्वस्त

मिश्र खतांचादेखील पुरवठा लक्ष्यांक मंजूर झाला आहे. त्यात यंदा मागील हंगामातील किंवा खरिपातील मिश्र खते शिल्लक आहेत. सध्या कुठल्याही खताची टंचाई नाही. खरिपात युरिया, १०.२६.२६ ची टंचाई तयार झाली होती. युरियाच्या टंचाईवरून जिल्हा नियोजन समितीची सभाही गाजली होती. ही समस्या लक्षात घेऊन युरियाचा देखील योग्य लक्ष्यांक मंजूर करून घेण्यात आला असून, त्याचाही सध्या मुबलक साठा आहे, अशी माहिती मिळाली.

संयुक्त खतांवरील लिकिंगबाबत हवी कारवाई

संयुक्त किंवा मिश्र खतांवरील लिकिंगची समस्या खरिपात कायम होती. ती रब्बीतही काही भागात केली जाईल. ही स्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खते घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना कुणी विक्रेत्याने करू नये, अशा सूचना बैठक घेऊन जारी कराव्यात अशी मागणीदेखील शेतकरी वर्गातून केली जात आहे. कारण खते परवडणारे नाहीत. त्यात लिकिंग झाल्यास खतांवरचा खर्च वाढतो, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

यंदा संयुक्त किंवा मिश्र खतांची टंचाई रब्बीत जाणवणार नाही. त्यासंबंधी आपल्या जिल्ह्याच्या मागणीनुसार खतपुरवठा लक्ष्यांक मंजूर झाला आहे. खतांचा पुरवठाही सुरळीत होईल. युरियाचा कुठलाही तुटवडा सध्या नाही व पुढेही नसणार आहे.
- विजय पवार, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com