Agriculture Machination : नवदुर्गा संशोधिकेने बनविली ४३ कृषी कृषी अवजारे

Agriculture Implements : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. स्मिता सोलंकी यांनी आजवर तब्बल ४३ कृषी अवजारे विकसित केली आहेत.
Agriculture Mechanization
Agriculture Mechanization Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. स्मिता सोलंकी यांनी आजवर तब्बल ४३ कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यातून कृषी यांत्रिकीरणास चालना मिळाली आहे.

शेतकऱ्यांचे श्रम व वेळेची बचत, मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. शेतकरी महिला, आदिवासी शेतकरी यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या नवदुर्गेने केलेले संशोधन उपयुक्त ठरत आहे.

डॉ. सोलंकी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी, पदव्युत्तर (एम. टेक.) पदवी संपादन केली. त्यानंतर चार वर्षे महाबीजमध्ये प्लॅन्ट व्यवस्थापक म्हणून काम केले. १९९३ मध्ये तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सेवेत रुजू झाल्या.

३० वर्षाच्या सेवा काळात शैक्षणिक तसेच कृषी यांत्रिकीकरण संशोधन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांसाठी नोकरी, व्यवसायासाठी समुपदेशन वर्ग, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : पाच महिने उलटले तरीही मिळेना अनुदान

२००३ मध्ये त्या कृषी यांत्रिकीकरणाच्या संशोधनाकडे वळल्या. अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी सुधारित कृषी अवजारे विकसित करण्यावर त्यांचा भर राहिला. सुधारित विळा, खुरपे, पऱ्हाटी उपटण्याचा चिमटा, बियाणे टोकन यंत्र, मका सोलणी यंत्र आदी अवजारांसह विविध बैलचलित अवजारे विकसित केली.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : निधीअभावी यांत्रिकीकरणाला ब्रेक

त्यात तिहेरी कोळपे, सौर फवारणी यंत्र, हळदी माती लावणी, उसाला माती लावण व खत देणे यंत्र, शेण स्लरी पसरविणे यंत्र, आजारी पशुधन उचलण्यासाठी संच आदी अवजारांचा समावेश आहे.

त्यामुळे मजुरांच्या समस्येतून मार्ग निघाला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ झाले. डॉ. सोलंकी २०१६ पासून कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या प्रमुख आहेत. मोठ्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी विवध ट्रॅक्टरचलित यंत्रेही विकसित केली. त्यात बीबीएफचा समावेश आहे.

विविध पुरस्काराने गौरव...

डॉ. सोलंकी यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०२३ मध्ये ‘वनामकृवि’तर्फे उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार दिला गेला. नुकताच बैलचलित अवजारांच्या संशोधनाबद्दल भारतीय पशुधन कल्याण मंडळातर्फे राष्ट्रीय प्राणी मित्र पुरस्कार बुधवारी (ता. ४) नवी दिल्ली येथे त्यांना प्रदान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com