Onion Export : कांदा निर्यात शुल्क वाढविल्याने ‘स्वाभिमानी’ आक्रमक

Export Duty on Onion : केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनाआक्रमक झाली आहे.
Farmer agressive
Farmer agressiveAgrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : कांद्याला चांगले दर मिळू लागताच केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून ते ४० टक्के केल्याने नगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. रविवारी (ता. २०) स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांनी राहुरी येथील बाजार समितीत केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

Farmer agressive
Onion Export Duty: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा निर्णय; कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ

राज्यात एकीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासकीय घोषित मदत शेतकऱ्यांना मिळाली नसताना दुसरीकडे नगर जिल्ह्यासह कांदा लागवड पट्ट्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जात मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या परिस्थितीत बांगलादेश आदी विदेशातून आपल्या कांद्याला मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत कांद्याचे क्विंटलचे दर २५०० रुपयांपर्यंत गेल्याने अडचणीतल्या शेतकऱ्याला मदतीचा थोडा हात मिळत होता.

अतिरिक्त कांदा उत्पादन आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी पिचलेला असताना गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव तुलनेने वधारल्याने आनंदित झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कांद्यावर लावलेल्या निर्णयात करामुळे (एक्स्पोर्ट ड्यूटी) चिंतेत भर पडली आहे. केंद्र सरकारने काल (१९ ऑगस्ट) अध्यादेश काढत कांद्यावरील निर्यात कर थेट ४० टक्के केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी संतापले आहेत. आता कुठे पैसे मिळू लागले असताना केंद्र सरकारचा हा निर्णय संताप आणणारा आहे.

Farmer agressive
Onion Export : कांदा निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट ; केंद्राच्या अधिसूचनेची होळी

आम्ही शेतकऱ्यांचे असे सातत्याने सांगणारे सरकार खऱ्या अर्थाने शेतकरीविरोधी आहेत हे सतत उघड झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. कांदावर ४० टक्के निर्यात कर लावल्याने दर पडण्याची शक्यता असल्याने या निर्णयाच्या निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.

सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर स्वाभिमानी अधिक आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्यासह सुनील इंगळे, सतीश पावर, विजुभाऊ डवले, जुगलकुमार गोसावी, सचिन गडगुळे, दिनेश वराले, आनंद वणे, सचिन म्हसे, प्रमोद पवार, रवींद्र निमसे, बाळासाहेब निमसे, संदीप शिरसाठ, बाबासाहेब चोथे, राहुल करपे यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com