Nira-Devghar Dam : नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले ; ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग

Bhor Rain Update : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे २ ऑगष्टला नीरा-देवघर धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यावेळी वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
Neera Devghar Dam
Neera Devghar DamAgrowon
Published on
Updated on

Dam News : भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे २ ऑगष्टला नीरा-देवघर धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यावेळी वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Neera Devghar Dam
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेकने पाणी सोडल्याने दररोज ६ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुरेशी वाढ होत नव्हती. त्यामुळे ८ ऑगष्टला वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेकने कमी करून ३५० करण्यात आला. मागील दहा दिवसांमध्ये धरणातील पाण्याची पातळी वाढली आणि शनिवारी (ता. १९) रात्री धरण १०० टक्के भरून धरणात ११.९१ टीएमसी पाणीसाठा झाला. शनिवारी रात्री बारा वाजता वीजनिर्मिती केंद्रातून पुन्हा ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

गेल्यावर्षी १३ ऑगष्टला नीरा-देवघर धरण शंभर टक्के भरले होते. नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढून धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणाच्या सांडव्याचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे नीरा पाटबंधारे विभागाचे श्रेणी १ चे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.

याशिवाय तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणातही ८८.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी भाटघर धरण १२ ऑगष्टला भरून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com