Soybean Purchase Pending : पस्तीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी

Soybean Market : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकरी पणन महासंघांतर्गत २७ केंद्रांवर सोमवारपर्यंत (ता. ६) किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये) दराने सोयाबीन विक्रीसाठी ४५ हजार ७७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकरी पणन महासंघांतर्गत २७ केंद्रांवर सोमवारपर्यंत (ता. ६) किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये) दराने सोयाबीन विक्रीसाठी ४५ हजार ७७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १० हजार ८५ शेतकऱ्यांचे २ लाख ३ हजार ५७८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. अद्याप नोंदणीकृत ३५ हजार ६८६ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी आहे. बारदाना नसल्यामुळे आठवडाभर खरेदी बंद राहिली.

सोमवारी (ता. ६) प्राप्त झालेला ४० हजार बारदाना केंद्रांवर पाठविण्यात आला. परंतु अपुऱ्या बारदान्यामुळे सोयाबीन खरेदीतील अडचणी कायम राहणार आहेत. परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २० हजार ८३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी आहे. त्यापैकी सोयाबीन केंद्रावर आणण्यासाठी ७ हजार ४६५ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले.

Soybean Market
MSP Soybean Procurement : नोंदणी केलेल्या ५.४४ लाख शेतकरी हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या प्रतिक्षेत; खरेदीला मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी!

आजवर ११ खरेदी केंद्रावर ३ हजार ११२ शेतकऱ्यांचे ६० हजार ९९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या सोयाबीनची किंमत २९ कोटी ४० लाख ५ हजार १०५ रुपये होते.खरेदीपैकी ४५ हजार ८०४ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आले. आजवर १० केंद्रांवरच्या २ हजार ५८८ शेतकऱ्यांना ४८ हजार ८६२ क्विंटल सोयाबीनचे २३ कोटी ९० लाख ३२ हजार ९०४ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर २४ हजार ९४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सोयाबीन केंद्रावर आणण्यासाठी १३ हजार १८० शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी ६ हजार ९७३ शेतकऱ्यांचे १ लाख ४३ हजार ४७९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या सोयाबीनची किंमत ७० कोटी १९ लाख १ हजार २२४ रुपये होते. खरेदी केलेल्यांपैकी ८६ हजार ३०१ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आले. सर्व १५ केंद्रावरील ३ हजार ६५४ शेतकऱ्यांना ७८ हजार ४५४ क्विंटल सोयाबीनचे ३८ कोटी ३७ लाख ९६ हजार ९६८ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

Soybean Market
Soybean Farmers : बारदाना टंचाईमुळे शेतकऱ्यांची कोंडी; सोयाबीन विक्रीत अडथळा

४० हजार बारदाना पुरवठा...

बारदान्याअभावी तब्बल आठवडाभर खरेदी बंद राहिली. केवळ ४० हजार बारदाना पुरवठा करण्यात आला. या दोन जिल्ह्यातील केंद्रावर बारदाना पुरवठा करण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून (ता. ७) सोयाबीन खरेदी सुरू होईल. परंतु खरेदीत खंड पडू नये यासाठी पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण...नोंदणीकृत शेतकरी...सोयाबीन खरेदी...शेतकरी संख्या

परभणी...१०४०...५७६८...२७६

पेडगाव...१९०७...६७८१...३८१

झरी...२११...००...००

वरपुड...४७८...१५०...६

बोरी...२७५३...५३३७...२९१

जिंतूर...१५६२...२६३५...१७१

सेलू...४२८९...११८४५...७१०

मानवत...१९३१...३६२८...२११

रुढीपाटी...९६१...२९७२...१४३

पाथरी...१६९१...४२२१...२१५

सोनपेठ...२०२७...१०५६१...३७८

पूर्णा...१९८१...६१९८...३३०

हिंगोली...१८५४...७२१९...३२५

कन्हेरगाव...१५१२...१३७५४...५४५

कळमनुरी...१९७२...९३५४...५०९

वारंगा...११७८...६९४१...३६९

वसमत...२०१४...९२०९...५१७

जवळा बाजार...२६५४...७९७१...५०३

येळेगाव...१४२५...८५७२...४०३

सेनगाव...१८७०...१८६७६...७९४

साखरा...१२४६...७७८२...३५२

शिवणी खुर्द...१४०७...७०८५...३९३

फाळेगाव...२०५७...१२६८७...६००

नागसिनगी...१७७४...१२६४९...५५८

आडगाव...१९७५...१०००२...५६१

उमरा...३७६...१९३०...९२

पुसेगाव...१६२६...९६४४...४५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com