Jowar Production : ज्वारी उत्पादकांना ३५० कोटींचा दणका

Jowar Registration : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही.
Jowar
JowarAgrowon

Jalgaon News : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजाराचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

एकट्या जिल्ह्याचा विचार केला तर ज्वारीचा पेरा, मिळणारा भावात आणि बाजारात सद्यःस्थितीत मिळणाऱ्या भावाचा एकत्रित विचार करता, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ३१५ कोटीचा फटका बसणार आहे.

Jowar
Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान्य खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची लुट सरू आहे. ज्वारीला ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटल मागे सरासरी १००० रुपयाचे नुकसान होत आहे. मक्याबरोबर ज्वारीची ही नोंदणी केली असती तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा ४८ हजार ४०३ हेक्टरवर झाला आहे. उत्पादन आणि बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावातील तफावत पाहिली तर तब्बल ३१५ कोटीचा फटका एकट्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना रब्बीत कष्टाने पिकविलेल्या पिकांना हमीभावापेक्षा तब्बल १ हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणि हमीभाव यातील तफावतीची रक्कम ही फरक म्हणून द्यावी अशी मागणी आहे.

Jowar
Jowar GI Rating : ‘दगडी ज्वारी’ला भौगोलिक मानांकन

शेतकरी त्रस्त, नेते व्यस्त

शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे नेते मात्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत व्यस्त आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या ज्वारीची माती झाली असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या नेत्यांना मात्र निवडणुकीचे पडले आहे.

शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा हजार रुपये कमी दर मिळत असूनही त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसल्याचे वास्तवता आहे. लोकप्रतिनिधींकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी शासनावर दबाव आणणे गरजेचे आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हमीभावात धान्य खरेदीची मागणी केली आहे. ते सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांनी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे.

आकडे बोलतात

जिल्ह्यात ज्वारीचा पेरा ४८४०३ हेक्टर

ज्वारीला हमीभाव ३१८० प्रति क्विंटल

ज्वारीचे अपेक्षित उत्पन्न ३२ लाख क्विंटल

ज्वारीला मिळत असलेला भाव २०००-२१०० प्रति क्विंटल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com