Maize Procurement : खानदेशात मका, बाजरी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईनात

Maize MSP : खानदेशात मका, बाजरीचे दर हमीभावापेक्षा कमी असून, हमीभाव खरेदी केंद्र पुढील सात ते आठ दिवसांत सुरू करण्याची मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधी करीत आहेत.
Maize
MaizeAgrowon

Dhule News : खानदेशात मका, बाजरीचे दर हमीभावापेक्षा कमी असून, हमीभाव खरेदी केंद्र पुढील सात ते आठ दिवसांत सुरू करण्याची मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधी करीत आहेत.

खानदेशात मका, बाजरीची आवक वाढली आहे. पण दर सुरुवातीपासून हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजरीचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर मक्याचे दर १५००, १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

केंद्र व राज्‍य सरकार राजकारणात मग्न असून शेतकऱ्यांना पूर्णत: वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील व महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांचा अतोनात छळ करण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे शिवसेनेचे नेते हेमंत साळुंखे यांनी म्हटले आहे.

Maize
Maize Cultivation : धानपट्ट्यात २५० एकरांवर बहरले मका पीक

शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व गारपिटीने आर्थिक नुकसान केलेले असताना आता तर शेतकऱ्यांच्या चाळीत असलेल्या कापूस, मका व कांदा यांना मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरुवातीला कापूस नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला.

शेतकऱ्यांना वाटले अजून भाव वाढतील या अपेक्षेने शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवण करून ठेवला. परंतु, भाव वाढायचे दूरच शेतकऱ्यांच्या कापसाला आजमितीला सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Maize
Maize Market : मक्याचे भाव वाढतील का?

शेतकरी आर्थिक संकटात

मका उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेळोवेळी मका, ज्वारी, हरभरा, तूर यांची हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मका पिकाचे चांगले उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली.

परंतु, आज शेतकऱ्यांना मक्यानेदेखील रडविले असून पंधराशे ते सोळाशेपर्यंत मक्याला भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तीच गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना कांदा पीक रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. ‘नाफेड’मार्फत धुळे जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करणे गरजेचे आहे.

सर्वच पिकांचे दर कमी

कापूस, मका, कांदा, टोमॅटो, भाजीपाला, पपई, केळी सगळ्याच पिकांची दरस्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे शेतकरी सरकार, निसर्ग, बाजारभाव याच्या गर्तेत फसला असून त्याचा कोणी वाली नाही अशी परिस्थिती सर्वदूर आहे. ग्रामीण भागातील जीवनमान पूर्णत: कोलमडले असून आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. शेतकऱ्यांचा छळ थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com