Women Entrepreneurs : सौर वाळवण तंत्र वापरातून ३५ महिला झाल्या उद्योजिका

Women Empowerment : नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्‍चात होणारे नुकसान व शेतीमाल दरातील अस्थिरता अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत असतो.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्‍चात होणारे नुकसान व शेतीमाल दरातील अस्थिरता अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत असतो. मात्र समस्यांवर उपाययोजना करण्यात महिलाही मागे नाहीत.

पर्याय शोधून महिला शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी सोलर ड्रायरचा अवलंब केला आहे. सह्याद्री फार्मच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३५ महिलांकडे सोलर ड्रायरद्वारे कामकाज सुरू आहे. त्यामुळे ‘चूल आणि मूल’ इतकेच सीमित न राहता आता महिला कृषी प्रक्रिया उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.

नाशिकसारख्या जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम माल तयार होतो. मात्र अडचणीच्या काळात हा नाशिवंत शेतीमालाचे मूल्यवर्धन केल्यास त्यातून उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण करू शकतात. याच उद्देशाने सह्याद्री फार्म्स व टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकीय आकांक्षा बाळगणाऱ्या महिलांचा पंखात बळ भरले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या सहकार्याने सोलार ड्रायर-अन्न प्रक्रिया क्षेत्रात उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी दहादिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात, ज्यामध्ये ४१ महिलांचा सहभाग होता, उद्योजकीय कौशल्य रुजविण्यात आले. त्यातून उद्योजकीय मानसिकता रुजली. त्यातून व्यवसाय स्थापना, बँकिंग आणि वित्त नियोजन, नेतृत्व कौशल्ये आणि नफा-तोट्याची गणिते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर महिला साक्षर झाल्या.

Women Empowerment
Women Empowerment : अल्पभूधारक महिला झाली शून्यातून प्रक्रिया उद्योजक

महिला स्वतःच्या क्षमतांच्या बळावर उत्तम उद्योजिका बनू शकते असा आत्मविश्वास प्रशिक्षणातून आला आहे. तर पुढील व्यावसायिक टप्प्यावर पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या माध्यमातून सोलर ड्रायरचे युनिट उभारणीचे सहकार्य झाले. यातून शेतीमाल प्रक्रिया त्यातून उत्पन्नवाढीचा मार्ग गवसला आहे. महिला उद्योजकांना सर्वांगीण साह्य मिळण्यासाठी टाटा स्ट्राइव्ह, कलेक्टिव फॉर इंटिग्रेटेड लीव्हलीहुड इनिशिएटिव्ह, बँकाचाही समावेश आहे. त्यातून मोठा हातभार लागला आहे.

सह्याद्री फार्म्सने महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे विपणन आणि विक्री सुलभ करण्यासाठी पावले उचलली आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेत महिलांच्या योगदानावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Women Empowerment
Women Empowerment : महिलांची ग्लोबल भरारी

सोलार ड्रायर युनिटचे अर्थकारण

एकूण १२ लाख रुपयांचे सोलार ड्रायर युनिट असून यामध्ये ३५ टक्के पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमइ) अनुदान, तर १५ टक्के सस्टेन प्लस-कलेक्टिव फॉर इंटिग्रेटेड लीव्हलीहुड इनिशिएटिव्हकडून मिळाले असून, उर्वरित रक्कम शेतकरी सहभागातून दिली जाते.

साधारणत: या उद्योगाद्वारे ४० ते ५० लाखांची वार्षिक उलाढाल होते. तसेच यातून महिलांना मासिक उत्पन्न २५ ते ३० हजार रुपये इतके मिळते. सह्याद्री फार्म्सतर्फे आतापर्यंत ३५ सोलार ड्रायर युनिटची उभारणी केली असून, यामध्ये बेदाणा, मेथी, कांदापात, स्ट्रॉबेरी, टोमॅटो आधी पिकांचे उत्पादन करून विक्री करण्यात येत आहे.

पूर्वी आम्ही शेती करायचो. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान व्हायचे. त्यावर आता पर्याय मिळाला. शेती कामकाज पाहून सोलर ड्रायरचे कामकाज करता येते. दोन पैसे मिळण्यासाठी ही नवी संधी आहे.
- कविता थोरात, महिला उद्योजक, मोहाडी, ता. दिंडोरी
सुरुवातीला २०० किलो क्षमतेचे सोलर ड्रायर होते. मात्र नंतर कामकाज समजल्यानंतर आता १००० किलो क्षमता तयार झाली आहे. या माध्यमातून स्ट्रॉबेरी, टोमॅटो असे शेतीमाल वाळवतो. यंदा बेदाण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. कच्चा माल पक्का होऊन बाजारात गेल्याने दोन पैसे मिळू लागले आहेत.
- वसुधा जाधव, महिला उद्योजक, रौळस पिंपरी, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com