Sugarcane Crushing : मराठवाड्यात ३४ लाख ४० हजार टन उसाचे गाळप

Marathwada Sugarcane Crushing : मराठवाड्यातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील १९ कारखान्यांनी ४ जानेवारीपर्यंत ३४ लाख ४० हजार ९१९ टन उसाचे गाळप केल्याची माहिती साखर विभागाकडून देण्यात आली.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील १९ कारखान्यांनी ४ जानेवारीपर्यंत ३४ लाख ४० हजार ९१९ टन उसाचे गाळप केल्याची माहिती साखर विभागाकडून देण्यात आली.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत १९ कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सहकारी ११ तर खासगी ८ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी ११ कारखान्यांनी १३ लाख ४३ हजार ३४३ टन उसाच गाळप करत ९ लाख ४७ हजार ९७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखर उत्पादन करताना कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ७.०६ टक्के राहिला.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : मराठवाड्यात ७३ लाख टन उसाचे गाळप

खासगी ८ कारखान्यांनी २० लाख ९७ हजार ६३५ टन उसाचे गाळप करत १५ लाख ३८ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे उत्पादन करताना खासगी साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.३३ टक्के इतका राहिला.

जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

 नंदुरबार : जिल्ह्यातील एका कारखान्याने ३ लाख ७८ हजार १२० टन उसाचे गाळप करत २ लाख ९ हजार ८३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ५.५५ टक्के इतका राहिला.

 जळगाव : जिल्ह्यातील एका कारखान्याने ६००७७ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.९४ टक्के साखर उताऱ्याने ५४३२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

 छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ७ लाख २० हजार ६८४ टन उसाची गाळप करत ६ लाख ५५ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.०९ टक्के राहिला.

जालना ः जिल्ह्यातील चार कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाद सहभाग नोंदविला या कारखान्यांनी ८ लाख १३ हजार ६८१ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.८२ टक्के साखर उताऱ्याने ६ लाख ३६ हजार ३७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

 बीड ः जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदाच्या हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी १४ लाख ६७ हजार ७१७ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.३४ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ३० हजार ९०० साखरेचे उत्पादन केले.

गाळपात जालना जिल्ह्याची आघाडी

जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिदिन क्षमतेच्या तुलनेत कमी ऊस गाळप केले. जालना जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी दैनिक क्षमतेच्या पुढे जाऊन उसाचे गाळप केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी दैनिक क्षमतेच्या तुलनेत कमी तर चार कारखान्यांनी क्षमतेच्या पुढे जाऊन गाळप केल्याची स्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com