Panchganga Pollution : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटींची मंजुरी ः शिंदे

Eknath Shinde : पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Panchganga River
Panchganga RiverAgrowon

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण आणि उद्‌घाटन सोहळा श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.

पंचगंगेत जाणारे सर्व सांडपाणी आता शुद्ध होऊन पंचगंगा १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते.

Panchganga River
Krushna River Pollution : कृष्णा नदीला विषारी विळखा, स्वच्छतेसाठी ८८० कोटींचा निधी मंजूर

श्री. शिंदे म्हणाले, की नुकतेच पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३२०० कोटी रुपये जागतिक बँकेकडून मंजूर केले आहेत. महापुरावेळी नगर विकास व आरोग्यमंत्री असताना येथे काम करताना मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली.

Panchganga River
Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’ला प्रदूषणाचा विळखा

कोल्हापूर हे आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी विविध देवस्थानांचा विकास करण्यासाठी नुकताच ९०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी थेट पाइपलाइन योजनेच्या पूर्णत्वाचा आनंद व्यक्त करून रंकाळा येथील कारंजाचा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोल्हापूरच्या वैभवात भर पडेल, असे सांगितले.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर कामे पूर्ण झाल्यावर येत्या दोन वर्षांत पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल, असे मत व्यक्त केले. तर राजेश क्षीसागर यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com