River Pollution : देशात ३११ नद्या प्रदूषित

Pollution : गेल्या काही वर्षापासून प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ पैकी ३११ नद्या प्रदूषित असल्याचे समोर आले आहे.
River Pollution
River PollutionAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही वर्षापासून प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ पैकी ३११ नद्या प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणून देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. महाराष्ट्रात ५५ नद्या प्रदूषित आहेत. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री, भीमा, गोदावरी या सर्वाधिक प्रदूषित नद्या असल्याचे समोर आले आहे.

देशातील नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नॅशनल वॉटर क्वालिटी मोनिटरिंग प्रोग्रामची अंमलबजावणी करीत असते. या वर्षी ६ जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल अलीकडेच प्रकाशित करण्यात आला आहे. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम एक ते पाच दिला जातो.

River Pollution
Godavari River Pollution : ‘जलपर्णी’मुक्त गोदावरीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

सर्वाधिक प्रदूषित नदी प्राधान्यामध्ये एकमध्ये तर सर्वांत कमी प्रदूषित नदी प्राधान्य पाचमध्ये समाविष्ट केली जाते. प्रदूषित नद्यांना स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून कृती आराखडा तयार केला जातो आणि नदी पुनर्जीवित समिती आणि केंद्रीय निरीक्षण समितीमार्फत प्रगतीवर लक्ष ठेवले जाते.

देशातील एकूण प्रदूषित ३११ नद्यांत सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये प्राधान्य एकमध्ये ४६ नद्या आहेत. तर प्राधान्य क्रमांक दोनमध्ये १६ आणि प्राधान्य तीनमध्ये ३९ नद्या आहेत. कमी प्रदूषित नद्यांतील प्राधान्य चारमध्ये ६५ तर प्राधान्य पाचमध्ये १४५ नद्या आहेत.

२०१९ आणि २०२१ या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांचे १५६ नमुने घेतले. त्यातील पाच नद्यांचे १४७ ठिकाणी घेतलेले नदीस्थळांचे नमुने बीओडी मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भीमा या सर्वाधिक प्रदूषित तर त्यानंतर क्रमाने गोदावरी, पवना, कन्हान आणि मुळा-मुठा प्रदूषित आढळल्या आहेत.

River Pollution
Polluted Rivers : नद्यांचा श्वास गुदमरतोय, लोकांच्या आरोग्याची कुणाला काळजी?

नद्या यामुळे होतात प्रदूषित :

उद्योग ः सर्व उद्योगांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही नद्या प्रदूषित होतात कारण उद्योजक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एकतर लावत नाहीत आणि लावल्या तर त्या सतत सुरू ठेवत नाहीत किंवा प्रदूषण मंडळाचे लक्ष नाही.

सांडपाणी ः अलीकडे उद्योगापेक्षा गावे, पालिका आणि महानगर पालिका क्षेत्रातून निघणारे सांडपाणी हे बहुतेक नद्या प्रदूषणास कारणीभूत आहेत. या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणावर तेल, डिटरजंट, विविध जड धातू, रसायने, शहरातील नाल्यावाटे वाहत आलेला प्लॅस्टिक जैविक कचरा असतो.

कृषी : शेतीमधील कीटकनाशके, रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा आणि जैविक कचरा हा नद्यांच्या सर्वसाधारण प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर घालतात.

राज्यनिहाय प्रदूषित असलेल्या नद्यांची संख्या :

राज्य --- नद्याची संख्या

महाराष्ट्र --- ५५

मध्य प्रदेश --- १९

बिहार --- १८

केरळ --- १८

कर्नाटक --- १७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com