Crop Damage : सांगलीत अवकाळी पावसामुळे ३० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Unseasonal Rain : सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या पाच दिवसांत मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील ३० हजार ८१९ शेतकऱ्यांचे १५९७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या पाच दिवसांत मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील ३० हजार ८१९ शेतकऱ्यांचे १५९७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

कृषी विभागासह संबंधित विभागाने बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. नुकसान झालेल्या पिकांसाठी ३५ कोटी ६५ लाख १५ हजार रुपये अपेक्षित मदतीच्या निधीची मागणी केली असल्याचे माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिरायत, बागयाती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. वादळी वारे, पाऊस याचा सर्वाधिक फटका फळपिकाला बसला आहे.

जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता नऊ तालुक्यांतील पिके बाधित झाली आहेत. कृषी विभागासह संबंधित विभागाने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. एका आठवड्यात तातडीने पंचमाने पूर्ण केले आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे अकोल्यात २०८ कोटींचे नुकसान

जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात या पावसाचा फारसा फटका पिकांना बसला नाही. शिराळ्याचा अपवाद वगळता इतर ८ तालुक्यांत पीक नुकसान झाले. आठ तालुक्यांतील ३११ गावांतील ३८ हजार ८१९ शेतकऱ्यांची १५ हजार ९७८ क्षेत्रातील पिके बाधित झाली. जिरायत पिकाचे ४१७ शेतकऱ्यांचे १४३.८६ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

फळपीक सोडून बागयती ४३२ शेतकऱ्यांचे १८३.०१ हेक्टर तर फळपिकाखालील बागायती २९ हजार ९७० शेतकऱ्यांचे १५ हजार ६५२.०५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचमाने केलेला अहवाल शासनाला सादर केला.

अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान फळ पिकांचे झाले आहे. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.
Crop Damage
Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

तालुकानिहाय नुकसान झालेले क्षेत्र व अपेक्षित भरपाई निधी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र अपेक्षित निधी

मिरज १००५४ ५६८५.९७ १२ कोटी ६० लाख ९५ हजार

वाळवा ३५३ १४३.२९ ३२ लाख २७ हजार

पलूस २४८५ १४३५.६४ ३ कोटी २२ लाख ९९ हजार

खानापूर १७० ८२.१८ १८ लाख २८ हजार

कडेगाव १० ५.०५ ८३ हजार

तासगाव ९५०१ ३८७९.५८ ८ कोटी ७० लाख ४२ हजार

आटपाडी ३८१ २५१.१३ ५५ लाख

जत २४४९ १७२५.३९ ३ कोटी ८१ लाख २५ हजार

कवठेमहांकाळ ५४१६ २७६९.६९ ६ कोटी २३ हजार

एकूण ३०८१९ १५९७८.९२ ३५ कोटी ६५ लाख १५ हजार

पीकनिहाय नुकसान

पीक प्रकार शेतकरी संख्या क्षेत्र अपेक्षित निधी

जिरायत ४१७ १४३.८६ १२ लाख २२ हजार

फळपीक सोडून बागयती ४३२ १८३.०१ ३१ लाख १६ हजार

फळपिकाखालील बागायती २९९७० १५६५२.०५ ३५ कोटी २१ लाख

७६ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com