Millet Festival : मिलेट महोत्सवात ३० लाखांची उलाढाल

Millet Year : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित केलेल्या मिलेट महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Millet
MilletAgrowon
Published on
Updated on

Pune News : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित केलेल्या मिलेट महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या महोत्सवात सुमारे २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल झाली.

महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगात कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला.

Millet
Millets : भरडधान्याला प्रोत्साहन देण्यात सरकार पडतंय कमी?

या वेळी मिलेट उत्पादकांना ४० स्टॉल देण्यात आले होते. ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्राही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी उत्पादने थेट उत्पादकांकडून उपलब्ध करून देण्यात आली.

Millet
Millet Mission : आता हवे महाराष्ट्र मिलेट मिशन

याबरोबरच मिलेट उत्पादन, मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्य विषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. खरेदीदार-विक्रेते संमेलन घेण्यात आले.

३५ हजार व्यक्तींची भेट

‘‘महोत्सवास विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, ग्राहक अशा साधारणतः ३० ते ३५ हजार व्यक्तींनी भेट देऊन मिलेटच्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची माहिती घेतली. उत्पादने खरेदी केली’’, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com