Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात गुरुवार (ता. ३०) पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ लाख ३० हजार ५३६ विमा प्रस्ताव साद केले असून २ लाख ३७ हजार ९१३ हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५६ हजार ८२९ विमा प्रस्ताव सादर केले आहेत ४२ हजार ६०२ हेक्टरवरील पीके विमा संरक्षित केली आहेत. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ लाख ८७ हजार ३६५ विमा प्रस्ताव सादर केले असून २ लाख ८० हजार ५१५ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
रब्बी ज्वारीच्या विमा प्रस्तावासाठी मंगळवार (ता. ५) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गहू व हरभरा या पीकांच्या विमा प्रस्तावांसाठी शुक्रवार (ता. १५) अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येत आहे.पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीद्वारे पिक पेरा नोंदणी करणे बंधनकारक आहे.जनसुविधा केंद्र,पिकविमा पोर्टलद्वारे पीक विम्याचे प्रस्ताव सादर करता येतील.
परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू (बागायती), हरभरा या पिकांचा तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. गुरुवार (ता. ३०) अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे ३ लाख ३० हजार ५३६ विमाप्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
त्याद्वारे २ लाख ३७ हजार ९१३ हेक्टरवरील पिकांसाठी ८७१ कोटी ३२ लाख २ हजार २९५ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. शेतकरी हिश्शाचा ३ लाख ३० हजार ५३६ रुपये, राज्य व केंद्र शासनाच्या हिश्य्याचा मिळून एकूण ९८ कोटी ५९ लाख ४८ हजार ८० रुपये एवढा विमा हप्ता आहे.
हिंगोली जिल्ह्यात गुरुवार (ता. ३०) अखेर पर्यंत ५६ हजार ८२९ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २ हजार २१३ आहे तर बिगर कर्जदार शेतकरी ५४ हजार ६१६ आहेत. एकूण ४२ हजार ६०२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी ५६ हजार ८२९ रुपये विमा हप्ता भरला आहे.
परभणी जिल्हा पिकनिहाय विमा प्रस्ताव स्थिती(क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक विमा प्रस्ताव संरक्षित क्षेत्र
ज्वारी ११९६८६ ७६२७०
हरभरा १८३३९७ १४८६६४
गहू २७४५३ १२९७८
उन्हाळी भुईमूग १०४६ ५०३
तालुकानिहाय पिकविमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये )
तालुका विमा प्रस्ताव संख्या विमा संरक्षित क्षेत्र
परभणी १७६४० १५०५०
जिंतूर १९७१४ १२९१४
सेलू १३०६३ ९६४५
मानवत ६४०४ ५७४७
पाथरी ८५६७ ६७१०
सोनपेठ ३३८२ २७८६
गंगाखेड ९४७६ ५५२२
पालम ८४२१ ४९५९
पूर्णा १०४५८ ७१८८
हिंगोली २६५१ २१७५
कळमनुरी १४१०९ १२८०१
वसमत १७०३३ ११०६६
औंढा नागनाथ १६६६४ ११२६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.