Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : मराठवाड्यात तीन दिवसांत २७१६ हेक्‍टर पिकांना दणका

Unseasonal Rain : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात अनेक भागांत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे.

Chhatrapati Sambhajinagr News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात अनेक भागांत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. ९ ते ११ एप्रिलदरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जवळपास २७१६ हेक्टरमधील शेती पिकाचे नुकसान झाले असून, शुक्रवारचा (ता. १२) नुकसानीचा आकडा येणे बाकी आहे.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ९ ते ११ एप्रिलदरम्यान तीन दिवसांत मराठवाड्यातील २०१ गावांतील ४३०१ शेतकऱ्यांच्या २७१६.३२ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे.

त्यापाठोपाठ नांदेड, धाराशिव, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी आदी जिल्ह्यांचा नुकसानीत क्रम लागतो. याशिवाय मराठवाड्यातील तीन व्यक्तींचा तसेच ८४ जनावरांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. याशिवाय नांदेडमधील चार व बीडमधील दोघे जखमी झाले आहेत.

Crop Damage
Crop Damage : अमरावती जिल्ह्यात नुकसान पोचले ५३ हजार हेक्‍टरवर

मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये धाराशिवमधील १३, लातूरमधील ९, बीडमधील ११, नांदेडमधील १८, हिंगोलीतील ८, परभणीतील ७, जालन्यातील १५ व छत्रपती संभाजीनगरमधील ३ जनावरांचा समावेश आहे.

दरम्यान, ३५६ कच्च्या-पक्क्या घरांची पडझड झाली आहे. नऊ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. त्यात धाराशिव व जालन्यातील प्रत्येकी एक तर हिंगोलीतील सात गोठ्यांचा समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पंचनामे करून आर्थिक मदत द्या

हिंगोलीतील ३३२ व बीडमधील १४ तसेच धाराशिवमधील चार कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. जालन्यातील पक्क्या पाच घरांची पडझड झाली आहे. पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात विविध भागांत कायमच आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा हा धोका आणखी किती नुकसान करणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

जिल्हानिहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

बीड...१०२०.९

नांदेड...७४८.५

धाराशिव...३०८

हिंगोली...२९७

छ.संभाजीनगर...१६३

जालना...१३३

लातूर...४२.९६

परभणी...२.६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com