Agriculture Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामांसाठी उचलले २६ टीएमसी पाणी

Water Scarcity : दुष्काळात शेतीच्या पाणी टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात पाणी टंचाई भासू लागली.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : दुष्काळात शेतीच्या पाणी टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात पाणी टंचाई भासू लागली. त्यामुळे शेतीतील पिकांची तहान भागवण्यासाठी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू केल्या. या तिन्हीही योजनांतून २६ टीएमसी पाणी उचलून पिकांची तहान भागवली असून लाभ क्षेत्रातील ७८१ पाणीसाठेही भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ हे दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यातील पिकांची तहान भागवण्यासाठी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना आहेत. योजना सुरू झाल्याने पिकांची तहान भागली जाते. आवर्तनाचे वेळाही ठरल्या आहेत. त्यानुसार आवर्तनही सुरू होतात. त्यामुळे पाण्याचा ताण फारसा भासत नाही. या सिंचन योजनांमुळे या दुष्काळी तालुक्यातील कोरडवाहू शेती बागायती झाली आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : नीरा उजव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या सिंचन योजनांसाठी रब्बी हंगामासाठी २५.०८ टीएमसी तर उन्हाळी हंगामासाठी ११.४३ टीएमसी आवर्तनासाठी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार रब्बी आणि उन्हाळी आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू केले जाते. वास्तविक, गतवर्षी मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी झाले. परतीचा पाऊस झाला नसल्याने सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला होता. त्यामुळे रब्बी हंगामासह फळ पिकांना पाण्याची टंचाई भासू लागली.

नोव्हेंबर, डिसेंबरपासून या योजनांचे सिंचनाचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला. रब्बी आणि उन्हाळी या दोन्ही हंगामातील पिकांना या योजनेच्या आवर्तनामुळे वेळेत पाणी उपलब्ध झाले. रब्बीसाठी १२.०३७ टीएमसी आणि उन्हाळीसाठी १४.०७४ असे एकूण २६.१११ टीएमसी पाणी सिंचन योजनेतून उचलून दुष्काळी भागातील पिकांना दिले आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Scheme : पाथर्डी, जामखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांसह १३ जणांना नोटिसा

तीन्ही हंगामांसाठी ४९.१३ टीएमसी राखीव

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगामांत पाण्याचे आवर्तन असते. त्यानुसार प्रत्येक योजनेसाठी हंगामनिहाय पाणी वापराचे नियोजन केले आहे. खरिपासाठी ताकारी १.८५, म्हैसाळ ६.२०, टेंभू ४.५९ टीएमसी, रब्बी हंगामासाठी ताकारी ४.३७, म्हैसाळ ८.०३, टेंभू १२.६८ टीएमसी आणि उन्हाळी हंगामासाठी ताकारी ३.१३ म्हैसाळ ४.२१, टेंभू ४.१० असे एकूण ४९.१३ टीएमसी पाणी तिन्ही हंगामांसाठी राखीव ठेवले आहे.

योजनेतून रब्बी आणि उन्हाळी

हंगामासाठी उचललेले पाणी (टीएमसी)

सिंचन योजना रब्बी उन्हाळी एकूण

ताकारी ३.११६ १.४४९ ४.५६५

म्हैसाळ ४.०८५ ५.१९५ ९.२८

टेंभू ४.८३६ ७.४३० १२.२६६

एकूण १२.०३७ १४.०७४ २६.१११

योजनेतून रब्बीसाठी भरलेले पाणीसाठे

योजना पाणीसाठा संख्या

ताकारी १४०

म्हैसाळ २९८

टेंभू ३४३

एकूण ७८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com