Pre Monsoon Rain: मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर शेतीला मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका

Marathwada Rain Damage: मराठवाड्यातील ८ पैकी ७ जिल्ह्यांत मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे.
Heavy Rain Crop Damage
Heavy Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील ८ पैकी ७ जिल्ह्यांत मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे. सुमारे २६९ गावांतील ३,७४४ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत मराठवाड्यातील बहुतांश भागात आकाशात ढगांची गर्दी व पावसाच्या आगमनाची शक्यता कायम होती.

प्रत्येक हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान होणे कायमचे ठरले आहे. आधी खरीप मग रब्बी आता उन्हाळी तसेच आंबा, मोसंबी, चिकू आदी फळपिकांना पावसाचा दणका बसला. प्राथमिक अंदाजानुसार, सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात दिसत असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, बीड आदी जिल्ह्यांचा शेतीपिकांच्या नुकसानीत क्रम लागतो. धाराशिव जिल्ह्यात मात्र पावसामुळे कुठलेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नसल्याची माहिती आहे.

Heavy Rain Crop Damage
Heavy Rain: वैभववाडी, कणकवलीला पावसाने झोडपले

जिल्हा पिकाचे नुकसान बाधित शेतकरी

(हेक्टरमध्ये) संख्या

जालना १९२३.८ २६३८

छ. संभाजीनगर ३१४.४ ६६३

नांदेड १७३.१ २८३

हिंगोली २९ १४

लातूर २७.२० ५१

परभणी २७ ३७

बीड १७.६७ ५८

Heavy Rain Crop Damage
Rain Crop Damage : अहिल्यानगरमध्ये १३० हेक्टरला पावसाचा फटका

८ मृत्यू, २ जखमी

नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड प्रत्येकी दोन, बीडमधील तीन, लातूरमधील एका जणांच्या समावेश आहे. तर जखमी व्यक्तीमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीडमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

३७ जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्तीत एकूण ३७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर २, परभणी ६, हिंगोली व नांदेडमधील प्रत्येकी १, बीड मधील १९, लातूर ३ व धाराशिवमधील एका जनावरांचा समावेश आहे.

गोठ्यांचे नुकसान

बीड जिल्ह्यातील घरांची पडझड होऊन अंशतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दोन गोठ्यांचेही नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com