Nagpur Development : नागपूर जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईचा २५ कोटींचा आराखडा

Water Scarcity Action Plan : जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई कृती आराखडा हा २५ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे.
Water Scarcity Action Plan
Water Scarcity Action PlanAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई कृती आराखडा हा २५ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. टँकर, खासगी विहिरींच्या अधीग्रहण उपाययोजना कमी असणार आहे. जलजीवन मिशनच्या कामामुळे हा आराखडा कमीचा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या वर्षी नवीन बोअरवेल घेण्यात येणार नसून फ्लशिंगवर जिल्हा प्रशासनाचा अधिक भर राहणार आहे. त्यासोबत शहरालगत असलेल्या हिंगणा, बोखारा, डिगडोह, हुडकेश्वर आदी ग्रामीण भागात जलजीवन मिशनमधून योजना पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे.

Water Scarcity Action Plan
Water Shortage : गोंदिया जिल्ह्यातील ७८ गावांसाठी पाणीटंचाईचा आठ कोटींचा आराखडा

काही छोट्या योजना पूर्ण झाल्याने हा भाग टंचाईमुक्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दर वर्षी वाढणारी टँकरची संख्या कमी झाली आहे. मागील वर्षी १५८ टँकर होते. या वर्षी संख्या ६८ वर आली आहे. २०२४-२०२५ वर्षातील २५ कोटी २१ लाख रुपयांच्या पाणीटंचाई प्रस्तावित आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

Water Scarcity Action Plan
Drought Update : सांगली जिल्ह्याचा ३१ कोटींचा टंचाई आराखडा

या वर्षीच्या आराखड्यात १४८६ गावांत उपाययोजना राबविण्यात येणार आहे. ३३४ गावांत खासगी विहीर अधिग्रहण, ६८ टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन, १८४ खासगी विहिरींचे खोलीकरण करणे, ६२८ विंधन विहीर विशेष दुरुस्ती करणे,

२७२ नळ योजनांची विशेष दुस्तीचा समावेश आहे. या सर्वांवर २५ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. ग्रामपंचायतींकडून टंचाईचे कामाचे प्रस्ताव उपविभागस्तरावरून प्राप्त झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com