Drought Update : सांगली जिल्ह्याचा ३१ कोटींचा टंचाई आराखडा

Water Crisis : पावसाअभावी जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जत आणि आटपाडीतील ५७ गावांना ५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Kolhapur Drought Condition
Kolhapur Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Sangli News : पावसाअभावी जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जत आणि आटपाडीतील ५७ गावांना ५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अद्याप चाराटंचाई निर्माण झाली आहे. परंतु संभाव्य उपाययोजनांसाठी ३१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा करण्यात आला आहे. तसेच सिंचन योजनांची वीजबिले टंचाई निधीतून भरली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १६) टंचाई, शासन आपल्या दारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ‘‘यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील काही भागाला टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५७ गावे ३९८ वाड्यावस्त्या टंचाईग्रस्त असून १ लाख २६ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Kolhapur Drought Condition
Drought Update : दुष्काळग्रस्त गावांत ‘महसूल’ची करवसुली !

अद्याप चाराटंचाई नसून त्याबाबतची मागणीही आलेली नाही. परंतु जिल्हा प्रशासनाने पुढील दोन ते तीन महिन्यांचे नियोजन केले आहे. जर चाऱ्याची आवश्यकता भासली तर त्याची तयारी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नवीन विंधन विहिरी, विहीर अधिग्रहण, टँकर तसेच विविध उपाययोजनांचा ३१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.’’

गेल्या काही दिवसांपासून सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शासनाकडून निर्णय देण्यात आला आहे. टंचाई निधीतून योजनांची बिले भरली जातील. येत्या काही दिवसांत पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दयानिधी यांनी केले.

Kolhapur Drought Condition
Drought Update : नव्या २२४ महसुल मंडलांत दुष्काळी स्थिती जाहीर

सांगली, कोल्हापूरच्या महापुरासंदर्भात जागतिक बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली. या पथकाने केलेल्या पाहणीनंतर नदी खोलीकरण, पुनर्वसन यावर सविस्तर चर्चा झाली. हा प्राथमिक दौरा होता. बँक मदत देण्यास सकारात्मक आहे. पाटबंधारे विभागाने ८०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. महापूर येऊ नये आणि महापूर आला तर काय करायचे, याबाबत उपायजोजनांचा उहापोह केला.

‘शासन आपल्या दारी’साठी मुख्यमंत्री येणार

जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारीअखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातही कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू असून कार्यक्रमाची तारीख लवकरच निश्चित होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com