Indian Economy : कौशल्य निर्मितीतून अर्थव्यवस्था झेप घेणार

Devendra Fadnavis : भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon

Nagpur News : भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १७) येथे केले.

युवक-युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी ‘पीएम स्कील रन’ ही दौड आयोजित करण्यात आली. दीक्षाभूमी परिसरातील अण्णा भाऊ साठे चौकातून ‘पीएम स्किल रन’ला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

Devendra Fadnavis
Ajit Pawar vs Devendra Fadanvis : अजित पवारांना फडणवीसांचा धक्का! भाजप नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा

राज्य शासनाने कौशल्य प्रशिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कौशल्यावर आधारित ‘पीएम विश्‍वकर्मा’ या एका नवीन योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे. या माध्यमातून पारंपरिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक साह्य मिळणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना त्रास दिल्यास घरी पाठवीन..., भरबैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांला फडणवीसांचा फोन

पीएम स्किल रन ही दौड आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे, मंत्री लोढा यांनी या वेळी सांगितले.

लोढा यांच्या हस्ते बक्षीस वितरण

दौडमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना या वेळी प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. विकास बिसने, भारत शाहू आणि तेजस बनकर यांनी पुरुष गटात तर महिला गटात मोना सोमकुवर, निकिता शाहू आणि तृप्ती बावणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व व तृतीय स्थान पटकावले.

कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने दौडमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले, तर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com