Monsoon 2024 : पावसाळ्यातील २३ दिवस उधाणाचे

Rain Forecast : पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील मोठ्या भरतीचे (उधाणाचे) वेळापत्रक महाराष्ट्र सागरी मंडळाने जाहीर केले आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

Mumbai News : पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील मोठ्या भरतीचे (उधाणाचे) वेळापत्रक महाराष्ट्र सागरी मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार चार महिन्यांत तब्बल २३ दिवस अरबी समुद्रात सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

सप्टेंबरमध्ये एकाच दिवसात दोनवेळा मोठी भरती येणार आहे. याच काळात मुसळधार पाऊस झाला, तर शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना, तसेच महापालिका प्रशासनाला सतर्कता बाळगावी लागणार आहे.

Monsoon
Monsoon Rain : माॅन्सूनची राज्यात जोरदार मुसंडी; राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये माॅन्सून दाखल; पावसाला पोषक हवामान

मिरा-भाईंदर शहर हे अरबी समुद्राच्या, तसेच वसई खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. शहरातील पावसाचे पाणी तब्बल दीडशे कच्च्या व पक्क्या नाल्यांद्वारे समुद्राला, तसेच खाडीला जाऊन मिळते, परंतु भौगोलिकदृष्ट्या शहराचा आकार कपबशीसारखा असून समुद्रसपाटीपासून हे शहर खाली आहे.

त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी पाणी वाहून नेण्याचे मार्ग आपोआपच बंद होतात. त्यातच समुद्राला सुमारे साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती असेल, तर समुद्राचे व खाडीचे पाणी उलट मार्गाने शहरात शिरते. त्याचवेळी शहरात मुसळधार पाऊस पडला, तर बहुतांश परिसर पाण्याखाली जातो.

Monsoon
Pre Monsoon Rain : राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

महापालिकेने शहरात सखल असलेली ३० ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी दर पावसात हमखास पाणी तुंबत असते. काही भागात तीन ते साडेतीन फुटांपर्यंत जलभराव होतो व इमारतींच्या तळमजल्यांवरील घरात पाणी शिरते. यात रहिवाशांचे खूपच नुकसान होते. अशा सखल भागातील पाणी उपसण्यासाठी महापालिकेने शक्तिशाली पंप तैनात केले आहेत,

मात्र हे पंप मुसळधार पावसात समुद्राला आलेल्या उधाणाच्या वेळी कुचकामी ठरतात. समुद्राला आलेली साडेचार मीटरची भरती ओसरेपर्यंत शहरातील पूरस्थिती कायम असते. महाराष्ट्र सागरी मंडळाने जून ते सप्टेंबर या काळातील उधाणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात चार महिन्यांत तब्बल २३ दिवस साडेचार मीटरच्या आसपास भरती असणार आहे.

भरतीचे वेळापत्रक तारीख वेळ (दुपारी) उधाण

(मीटरमध्ये)

६ जून १२.३२ ४.९१

७ जून १.१५ ४.९२

८ जून १.५७ ४.८३

२३ जून १.४० ४.७३

२४ जून २.१९ ४.७८

२५ जून ३.०० ४.७३

५ जुलै १२.२६ ४.७२

६ जुलै १.०७ ४.७४

७ जुलै १.४५ ४.६९

२२ जुलै १.२१ ४.८३

२३ जुलै १.५९ ४.९१

२४ जुलै २.३७ ४.८८

३ ऑगस्ट १२.१६ ४.४९

४ ऑगस्ट १२.५१ ४.५३

५ ऑगस्ट १.२४ ४.५१

२० ऑगस्ट १२.५५ ४.८३

२१ ऑगस्ट १.३२ ४.९०

२२ ऑगस्ट २.०८ ४.८४

२ सप्टेंबर १२.२५ ४.३०

३ सप्टेंबर १२.५२ ४.३१

४ सप्टेंबर १.१९ ४.२८

२० सप्टेंबर १.३७ ४.६५

२१ सप्टेंबर रात्री २.१५ ४.८६

२१ सप्टेंबर २.१४ ४.४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com