
Pune News : झपाट्याने होणारे औद्योगिक आणि नागरिकरणामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. याचा दुष्पपरिणाम हवामान आणि पावसावर होऊ लागल्याने, अनियमित आणि अनियंत्रित पाऊस होत आहे.
यामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रणासाठी कठोर आणि दीर्घकालीन उपयायजोनांची गरज, असल्याचे मत आयआयटीएमचे हवामान संशोधक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केले.
भवताल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भवताल टॉक कार्यक्रमात हवामान बदलाचे आव्हान पेलायचे कसे? सद्यःस्थिती आणि वाटचाल डॉ. मॅथ्यू बोलत होते. यावेळी राज्य पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे संचालक अभिजित घोरपडे हवामान अभ्यासक डॉ.विनितकुमार सिंग, ‘भवताल’ चे संचालक अभिजित घोरपडे यावेळी उपस्थित होते.
डॉ. मॅथ्यू म्हणाले,‘‘ कार्बन सह मिथेन आणि ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनाचा वेग झपाट्याने वाढतोय. यामुळे तापमान वाढ होत असून, समुद्राचे तापमान देखील वाढत आहे. परिणामी पावसाचा पॅटर्न बदलत असून, असमान आणि एकाच वेळी जास्त पाऊस पडत आहे. यामुळे शहरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
हे आव्हान सर्वांसमोर आहे. पावसाच्या असमान वितरणाबरोबरच समुद्राची पातळी देखील वाढत असून, दरवर्षी समुद्रकिनाऱ्याची १७ मिटर पर्यंत जमीन पाण्याखाली जात आहे. समुद्र आता घरांच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. यासर्व समस्यांवर ठोस उपाययोजनांची गरज असून, मुंबई मध्ये खारफुटीचे संवर्धन हा चांगला पुढाकार आहे.’’
डॉ. विनीत सिंह म्हणाले,‘‘ हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे वादळांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील वादळांची संख्या आणि त्यांचा वेग वाढत आहे. आणि ही वादळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वाढली असून, गेल्या २० वर्षात त्यांची संख्या ही ५० टक्क्यांनी वाढली असून, वेग १५० किलोमीटर प्रति तास असा वाढला आहे. वादळ कधीपण आपले रूप बदलतात. त्यामुळे ते कधी उग्र होतात तर कधी लवकर निष्क्रिय होतात. पण उग्र रूप धारण केल्यावर त्याचा पुढील १२ तासांचा अंदाज देण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे.’’
क्लायमेंट चेंज चे अभिजित घोरपडे म्हणाले,‘‘२०१५ ते २०२४ या कालावधीमध्ये २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष होते, जगभरात उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत, राज्यात देखील हवामान बदलाचा स्पष्ट परिणाम दिसतो आहे,
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागात जल संकट वाढणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचा परिणाम दिसतो आहे, हे सर्व लक्षात घेऊन राज्य वातावरणीय अनुकूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.’’ भवतालचे घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. दर्शना कुंटे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.