Power Generation : संखच्या प्रकल्पातून ‘म्हैसाळ’साठी २०० मेगावॉट वीज

Solar Project Update : सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे.
Solar Power
Solar PowerAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणूक, आराखडा निश्‍चिती आणि निविदा असे पहिले टप्पे आहेत. काही कामांच्या फेरनिविदा काढाव्या लागणार आहेत.

या प्रकल्पातून २०० मेगावॉट वीजनिर्मिती अपेक्षित असून, जत तालुक्यातील संख येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. शुक्रवारी (ता. २८) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याचा उल्लेख केला. राज्यातील एकूण सौरऊर्जा प्रकल्पांसाठी चार हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Solar Power
Solar Project : पश्चिम महाराष्ट्रात उभारणार ९०० मेगावॅट चा सौरऊर्जा प्रकल्प

केएफसी जर्मन बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि केंद्र सरकारच्या निधीतून सौरऊर्जा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यातून सुमारे २०० मेगावॉट वीजनिर्मिती होईल. सध्या म्हैसाळ योजनेला ९६ मेगावॉट वीज लागते. रात्रीच्या वेळी वीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे दुप्पट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

पाणी आवर्तन काळ वगळता अन्य काळात ही वीज विकली जाईल. त्यातून ‘पाटबंधारे’ला उत्पन्नाचे साधन मिळेल आणि प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च निघेल. २५ वर्षे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल, नंतर त्याची क्षमता ७५ टक्क्यांवर येईल. म्हैसाळ योजनेचे पंप या ऊर्जेवर चालवले जातील. त्यासाठी पंप हाउसमध्ये काही बदल आवश्‍यक आहेत. त्याची क्षमताही वाढवली जाणार आहे. २५ वर्षांच्या काळात गुंतवणुकीच्या चौपटीने वसुली होईल, असे अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Solar Power
Solar Pump Subsidy : सौर कृषीपंपासाठी सरकार देतंय ९० टक्के अनुदान

दृष्‍टिक्षेपात प्रकल्प

सौरऊर्जा प्रकल्प खर्च : १ हजार कोटी

पंपहाउस क्षमता वाढवणे खर्च : ३५० कोटी

निर्माण होणारी वीज : २०० मेगावॉट

प्रकल्पाला लागणारी जमीन : २०० हेक्टर

शेतकऱ्यांना लाभ

सध्या सिंचनाच्या खर्चाच्या वसुलीचे प्रमाण ८१-१९ असे आहे. शेतकऱ्यांवर १९ टक्के जबाबदारी आहे. सौरऊर्जेवर प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यातही कपात होईल आणि शेतकऱ्यांना पाणीपट्टी कमी आकारता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा थेट लाभ होणार आहे. कारण, सध्या विजेचा खर्च अवाढव्य आहे. ५ रुपये ६० पैसे दराने सध्या वीज मिळते. तो सगळा खर्च वाचेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com