Mahesh Gaikwad
अनियमित वीजपुरवठा आणि भारनियमनामुळे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे झाले आहे.
शेतीला सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांवरील वीजबीलाचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारमार्फत 'पीएम कुसुम योजना' राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जातात. यासाठी शेतकऱ्यांना अनुदानासह अगदी माफक खर्च येतो.
केंद्र सरकारद्वारा राबविण्यात येत असलेल्या या योजने अंतर्गत शेतामध्ये सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जाते.
या योजनेंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये २ ते ५ अश्वशक्तीचे सौर कृषीपंपाचे संच बसवू शकतात.
या योजनेत केंद्र सरकार ६० टक्के अनुदान आणि ३० टक्के कर्ज देते. तर शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या केवळ १० टक्के खर्च करावा लागतो.
केंद्र सरकारने या योजनेंतर्गत देशातील ३५ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. यासाठी शेतकरी https://pmkusum.mnre.gov.in/ या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.