Solar Power Project : झोडगेत होणार सौरऊर्जा प्रकल्प

Dada Bhuse : पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची वीजदेयक शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा नोव्हेंबरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती.
Solar Project
Solar ProjectAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची वीजदेयक शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा नोव्हेंबरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आराखडा सादर करून तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून झोडगे(ता. मालेगाव) येथे एक मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ५ कोटी ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

Solar Project
Kusum Solar Scheme : कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आदींच्या वीज देयकांचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्यात अनेक शाळांची वीज देयके धकल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांच्या जोडण्या तोडल्या आहेत.

तशीच परिस्थिती अनेक ग्रामपंचायतींचीही आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायत कार्यालये यांच्या वीज देयकांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

Solar Project
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

त्यानुसार महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या मदतीने झोडगे येथे ८ हेक्टर सरकारी जागेवर हा एक मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र राज्य अपारंपरिक ऊर्जा प्राधिकरण यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी या प्रकल्पास पाच कोटी ९५ लाखांची प्रशासकीय मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला पाच कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

१५ लाख युनिट वीजनिर्मिती

झोडगे येथे सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून, त्या विजेच्या बदल्यात महावितरण कंपनी जिल्ह्यातील सर्व शासकीय प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना ती वीज देणार आहे.

या प्रकल्पातून वर्षाला साधारण १५ लाख युनिट वीज तयार होणार आहे. यातून जिल्ह्यातील तब्बल दोन हजार सरकारी आस्थापनांना वीज मिळू शकणार आहे. जिल्ह्यात एक हजार ३८८ ग्रामपंचायत कार्यालये, ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन हजार २०० प्राथमिक शाळा आहेत. त्यातील दोन हजार आस्थापनांचा वीज देवकांचा प्रश्न मार्गी लागू शकणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com