Dam Water Storage : ‘येलदरी’त ५३.०१ टक्के, तर ‘निम्न दुधना’त ७०.८५ टक्केवर पाणीसाठा

Parbhani Rain Update : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २) दुपारी १२ वाजता येलदरी धरणामध्ये ४२९.३०० एमएमक्युबनुसार ५३.०१ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणामध्ये ७०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. दुपारी साडे अकरा वाजता निम्न दुधना धरणाच्या ४ दरवाजाद्वारे ६५२८ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला.

Dam Water Storage
Heavy Rain Nanded : नांदेडला पाच तालुक्यांसह २६ मंडलांत अतिवृष्टी

सिध्देश्वर धरण भरल्यामुळे रविवारी (ता. १) सायंकाळी १४ दरवाजाद्वारे नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. येलदरी धरणाची एकूण जलसाठवण क्षमता ९३४.४४० एमएमक्युब आहे. प्रकल्पीय जिवंतसाठा ८०९.७७० एमएमक्युब आहे. धरण क्षेत्रात यंदा १ जून पासून ९९१ मिलिमीटर आहे. आजवर एकूण २२७.५७६ एमएमक्युब पाण्याचा येवा झाला.

Dam Water Storage
Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये १७४ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणात ८५.१७४ एमएमक्युब पाण्याची आवक झाली. सोमवारी (ता. २) सकाळी आठ वाजता ४२३.९८४ एमएमक्युबनुसार ५२.३५ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. निम्न दुधना धरणातील प्रकल्पीय जिवंत पाणीसाठा २४०.२०० दलघमी आहे.

रविवारी (ता. १) सकाळी ६ वाजता ५८.३६५ दलघमी म्हणजेच २४.१० टक्के पाणीसाठा होता. सोमवारी (ता.२) सकाळी ६ वाजता १५०.००६ दलमघी म्हणजेच ६१.९३ टक्के पाणीसाठा होता. सकाळी १० वाजता १७१.६३ दलघमीनुसार ७०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे निम्न दुधना धरणातून नदी पात्रात विसर्ग सुरु आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com