Police Bharati : निफाड महाविद्यालयाचे १७ विद्यार्थी पोलिस, सैन्य दलात

Police Bharati Nivad : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (मविप्र)निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी १७ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस व भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.
Police Bharati
Police BharatiAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (मविप्र)निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी १७ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस व भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.

महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील एनसीसी कॅडेट्स व क्रीडा विभागातील खेळाडू यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय सेवेत यशस्वीपणे बाजी मारत नोकरीची संधी मिळवली आहे. यावेळी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते नोकरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.

Police Bharati
Mahila Police Bharti : ग्रामीण भागातील 'सावित्रीच्या लेकीं'ची पोलीस दलात गगनभरारी

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका शोभा बोरस्ते यांसह सर्व सभासद, हितचिंतक, सर्व प्राध्यापक वृंद आणि आप्तेष्ट नातेवाईक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

खऱ्या अर्थाने शिक्षणाचा हेतू व उद्देश म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यासोबतच त्याच्या कुटुंबालादेखील आर्थिक पाठबळ निर्माण होऊन जीवनमान उंचावणे होय.हा हेतू खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचे अविरत कार्य निफाड महाविद्यालय व त्यातील सर्व घटक करत आहेत. १९७१ साली स्थापना झालेल्या महाविद्यालयाचा वेलू मविप्र कर्मवीरांच्या तत्त्व आणि आदर्शांवर निसंकोचपणे गगनात यशस्वीपणे झेपावतो आहे.
– बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था

या विद्यार्थ्यांची झाली निवड
पोलिस दल: रोशनी कादरी,यास्मिन पिंजारी, सिद्धार्थ सानप, वैभव घोलप, आदित्य शिरसाट, चेतन कडाळे, पियुषकुमार यादव, शुभम खैरे
भारतीय सैन्य दल: प्रल्हाद गायकवाड, धनंजय शिंदे, किरण कासार, अनिकेत वाळके, अनिकेत सोमवंशी, प्रथमेश ताडगे, अभिराज मोगरे, प्रमोद हिलाल, निरंजन पवार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com