Lok Sabha Election 2024 : दीड हजार वयोवृद्ध, दिव्यांग करणार घरूनच मतदान

Vote From Home : निवडणूक आयोगाने यंदा ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांगांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Lok Sabha Election 2024`
Lok Sabha Election 2024`Agrowon

Yawatmal News : निवडणूक आयोगाने यंदा ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांगांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले, अशा एक हजार ५५४ मतदारांना घरूनच मतदान करता येणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.१२) कारंजा येथे पहिले मतदान झाले.

८५ वर्षांवरील ज्येष्ठ व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांना घरी बसूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली आहे. जिल्ह्यातील ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या २३ हजार ७४३ आहे. त्यातील ज्या मतदारांनी निवडणूक विभागाला १२‘ड’ नमूना भरून परवानगी मागितली, त्यांच्यासाठी जागेवरच तात्पुरते मतदान केंद्र तयार केले जाणार आहे. आतापर्यंत ८५ वर्षांवरील एक हजार २२० व ३३४ दिव्यांगांनी अर्ज केले आहेत.

Lok Sabha Election 2024`
Baramati Lok Sabha : आता शिवतारे-अजित पवार यांची दोस्ती पाहा : शिवतारे

बॅलेट मतदानाला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून (ता.१२) सुरुवात झाली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेतील कारंजा विधानसभा मतदारसंघात पहिले ८५ वर्षांवरील मतदाराचे मतदान झाले. २० एप्रिलपर्यत बॅलेट मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.

यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोलिंग पार्टी तयार करण्यात आली आहे. त्यात दोन पोलिंग अधिकारी, एक सुक्ष्म निरीक्षक, एक व्हिडिओग्राफर, एक पोलिस कर्मचारी अशा पाच जणांचे पथक आहे. त्या भागातील क्षेत्रानुसार पथकाला जबाबदारी देण्यात आली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. येत्या काही दिवसांत अर्ज केलेल्या सर्व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग व निवडणूक प्रकियेतील इतर कर्मचाऱ्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.

Lok Sabha Election 2024`
Sangli Lok sabha : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली लोकसभेसाठी महेश खराडे रिंगणात

बॅलेटवर करावी लागणार खूण

निवडणूक विभागाकडे अर्ज केलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी घरीच तात्पुरते मतदान केंद्र तयार करून मतदान करून घेतले जात आहे. मतदारांना बॅलेट पेपर देऊन त्यांच्यावर एकाच उमेदवारांच्या नावासमोर टीक करायची आहे. ही मतपत्रिका बंद करून जमा केली जाणार आहे.

दीड हजार सर्व्हिस वोटर

निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करता येते. यंदाही एक हजार ५४५ कर्मचाऱ्यांना ही सुविधा देण्यात आली आहे. मतपत्रिका वाटप करण्यात आल्या असून, मतदान करून ती स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com