Unseasonal Rain : सोलापुर जिल्ह्यातील १६८४ हेक्टरला अवकाळीचा फटका

Rain Update : सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका जिल्ह्यातील पाच तालुक्यांना बसला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Solapur News : सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका जिल्ह्यातील पाच तालुक्यांना बसला आहे. सर्वाधिक तडाखा पंढरपूर, माळशिरस व माढा या तालुक्यांना बसला असून जिल्ह्यातील १६८४ हेक्टरवरील पिकांचे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यात एकाचा व मोहोळ तालुक्यात एकाचा, असा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या वादळी वाऱ्यामध्ये ११ जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ८ मोठ्या व ३ लहान जनावरांचा समावेश आहे.

Rain Update
Unseasonal Rain : पावसामुळे इंदापूर तालुक्यातील केळीची बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यात एकाचा व मोहोळ तालुक्यात एकाचा, असा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या वादळी वाऱ्यामध्ये ११ जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ८ मोठ्या व ३ लहान जनावरांचा समावेश आहे.

करमाळा व पंढरपूर तालुक्यातील प्रत्येकी तीन, माढा व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी दोन व मोहोळ तालुक्यातील एका मोठ्या जनावराचा मृत्यू झाला आहे. माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील प्रत्येकी दोन मोहोळ व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एक अशा आठ लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Rain Update
Unseasonal Rain : पावसामुळे इंदापूर तालुक्यातील केळीची बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे या पाच तालुक्यातील ४५१ घरांची अंशता: पडझड झाली आहे. सर्वाधिक २१७ घरांची पडझड पंढरपूर तालुक्यात झाली आहे. माळशिरस तालुक्यात १३३, माढा तालुक्यात ६७, करमाळा तालुक्यात २५ व सांगोला तालुक्यातील ९ घरांची पडझड झाली आहे. माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला व माळशिरस या पाच तालुक्यातील ११९४ शेतकऱ्यांना वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

माढा तालुक्यातील ११९ शेतकऱ्यांचे ७५३ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील ६० शेतकऱ्यांचे ९२.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील २८६ शेतकऱ्यांचे १४१ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील सहा शेतकऱ्यांचे चार हेक्टर वरील नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यातील ७२३ शेतकऱ्यांचे ६९४ हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर

सोलापूर शहर व परिसरात आज तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर आला होता. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार झाला होता. बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गुरुवारच्या तापमानात मोठी घट झाली होती. तापमानात घट झाली असली तरीही आज दिवसभर प्रचंड उकाडा होता. सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ पर्यंत १०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com