Unseasonal Rain : पावसामुळे इंदापूर तालुक्यातील केळीची बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त

Banana Orchard :इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील कळाशी, कालठण नंबर १, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ येथे मंगळवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाखा बसला.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Pune News : इंदापूर  : इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील कळाशी, कालठण नंबर १, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ येथे मंगळवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाखा बसला.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणीटंचाईच्या काळात देखील मोठ्या कष्टाने पिकवलेली व हाता-तोंडाशी आलेली केळीची बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले.पावसामुळे अनेकांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या तर आंबा, कांदा, ऊस पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने गेली दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला.

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रालगतच्या गावात वादळी वाऱ्याने थैमान घातले. यात अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. बागांमध्ये सध्या केळी तोडणीचे काम सुरू होते.
उजनी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारा व पाऊस यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी करून माहिती घेतली. तसेच शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्याबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक अप्पासाहेब जगदाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागांवर संकट

तालुकानिहाय घरपट्टी व पाणीपट्टी वसुली (कोटी रुपयांत)

तालुका घरपट्टी पाणीपट्टी

आंबेगाव ५.६९ १.९७
बारामती १२.५७ ७.३६
भोर ९.४५ २.४
दौंड १२.६२ १.५२
हवेली ३६.३६ ४.३०
इंदापूर १३.४७ ३.९१
जुन्नर ३०.३० ६.८९
खेड २६.१० ३.०८
मावळ ३५.३९ ५.९
मुळशी ७२.७५ ३.५६
पुरंदर ८.६ २.४८
शिरूर ६१.१६ ५.६२
राजगड १.९५ ०.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com