Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

Gram Panchayat Election : सरपंच पदाच्या २४ जागेसाठी १६१ अर्ज

Beed Local Body Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायत व रामेश्वरवाडीच्या एका सदस्याच्या जागेसाठी पोट निवडणूक होत आहे.
Published on

Beed News : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या २४ जागेसाठी १६१ उमेदवारी अर्ज तर सदस्य पदांसाठी एकूण ७८५ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : सोलापुरात सरपंचपदासाठी ७८९ जण इच्छुक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायत व रामेश्वरवाडीच्या एका सदस्याच्या जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदाच्या २४ जागेसाठी एकूण १५७ उमेदवारांनी १६१ उमेदवारी अर्ज दाखल केले.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : ग्राम पंचायत निवडणुकांसाठी १९३ अर्ज दाखल

तर, सदस्य पदाच्या जागेसाठी ७८० उमेदवारांनी आपले ७८५ उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांना २५ ऑक्टोबरपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुका

सासुरा, बनकरंजा, लिंबाची वाडी, पिराचीवाडी, कोल्हेवाडी, तरनळी, मुलेगाव, उंदरी, आडस, केकाणवाडी, होळ, बोरीसावरगाव, युसूफवडगाव, भालगाव, नायगाव, बनसारोळा, माळेगाव, सुर्डी, शिरपूरा, डोणगाव, काळेगावघाट, आरणगाव, नांदुरघाट, पिठ्ठीघाट या ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाची तर रामेश्वरवाडीच्या एका सदस्याच्या जागेच्या पोटनिवडणूक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com