Mahavitaran : ‘महावितरण’कडून सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना १५ कोटींचा परतावा

Refund on Security Deposit : छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १३ लाख १९ हजार २८२ लघुदाब वीजग्राहकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १५ कोटी ७ लाख रुपये व्याज देण्यात आले आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महावितरणकडे जमा असलेल्या वीजबिलांच्या सुरक्षा ठेवीवर छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १३ लाख १९ हजार २८२ लघुदाब वीजग्राहकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १५ कोटी ७ लाख रुपये व्याज देण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आल्याची माहिती महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ३ लाख ७४ हजार १६६ ग्राहकांना ६ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील ६ लाख १२ हजार ४० ग्राहकांना ६ कोटी ३ लाख रुपये तर जालना मंडलातील ३ लाख ३३ हजार ७६ ग्राहकांना ३ कोटी ४ लाख व्याज देण्यात आले आहे. सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतली जाते?

Mahavitaran
Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीजग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात महिनाभर वीज वापरल्यानंतर ग्राहकांना महावितरण वीजबिल देते. ते भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देते. मुदत संपल्यानंतरही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देते.

Mahavitaran
Mahavitaran Mission 90 Days : अकोला परिमंडलात महावितरणचा ‘मिशन ९० दिवस’ उपक्रम

हा सर्व कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार हमी म्हणून ग्राहकांकडून मागील वार्षिक वीजवापराच्या सरासरी दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केली जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com