Mahavitaran Mission 90 Days : अकोला परिमंडलात महावितरणचा ‘मिशन ९० दिवस’ उपक्रम

Mahavitaran Customer Oriented Service : ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी महावितरण अकोला परिमंडलात मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन ९० दिवस’ राबवला जात आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon
Published on
Updated on

Akola News : परिमंडलातील वीज ग्राहकांकडील बिलाची थकबाकी शुन्य करणे, परिमंडलाला अपघात मुक्त करणे, वीज चोरीला आळा, ग्राहकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा, दर्जेदार वीज सेवा देणे, मागेल त्या ग्राहकाला ताबडतोब वीजपुरवठा उपलब्ध करून देणे या व अशा ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी महावितरण अकोला परिमंडलात मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन ९० दिवस’ राबवला जात आहे.

जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत या उपक्रमात वरिष्ठ अधिकारी ते परिमंडलांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील शेवटचा कर्मचारी सहभागी करण्यात आला आहे.

Mahavitaran
Mahavitaran Electricity : हजारो वीज ग्राहकांचा छापील बिलांना ‘बायबाय’

शंभर टक्के वीजबिल वसुलीला प्राधान्य

परिमंडलातील थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील वीजबिल वसुलीसाठी वसुली मोहीम राबवून त्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करणे, पार्ट पेमेंट न घेणे, तसेच ग्राहकांना वेळेत आणि नियमित वीजबिल भरण्याची सवय लागावी यासाठी यापुढे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन ३१ मार्चपर्यंत परिमंडळ कार्यालयाची वीज बिलाची थकबाकी शून्य करण्यावर भर देण्यात आला आहे.

Mahavitaran
Mahavitaran Electricity : ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी महावितरणच्या ॲपवर सुविधा

महावितरणच्या या उपक्रमात १०० टक्के वीज ग्राहकांना अचूक वीज बिल देणे, ग्राहकांच्या वीज सेवेशी संबंधित किंवा वीजबिलाशी संबंधित तक्रारी ताबडतोब सोडविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय ग्राहकांच्या तक्रारी महावितरणच्या मानकांनुसार निकाली काढण्यासाठी या तक्रारींचा पाठपुरावा मंडळ कार्यालयांकडून दर आठवड्याला घेण्याला सुरुवात केलेली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी तिनही जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता प्रशासन यांच्याशी संपर्क करण्याबाबत याआधीच कळविले आहे.

मागेल त्याला वीज जोडणी

परिमंडलात आवश्यक कागदपत्रासह वीज जोडणीसाठी अर्ज करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब वीज जोडणी देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा आवश्यक नसलेल्या ग्राहकांना २४ ते ४८ तासांत, तर पायाभूत सुविधेची गरज असलेल्या ग्राहकांना महावितरणच्या कृतीमानकांनुसार वीज जोडणी देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com