Panchganga River : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १३९ कोटींचा निधी मंजूर

Kolhapur Panchganga River : कोल्हापूर शहरातील सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘अमृत-२’ योजनेतून १३९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Panchganga River
Panchganga Riveragrowon

Pollution Panchganga River : कोल्हापूर शहरातील सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘अमृत-२’ योजनेतून सादर केलेल्या बापट कॅम्प झोनमधील १३९ कोटींच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने काल(ता.११) प्रशासकीय मान्यता दिली. त्याचे पत्र महापालिकेला मिळताच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

याशिवाय प्रदूषण रोखण्याच्या उर्वरित कामांसाठी ४६ कोटींचा प्रस्ताव नगरोत्थान योजनेतून सादर केला आहे. त्याच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे.

शहरातील विविध नाल्यांमुळे होत असलेले पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वीही शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. त्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उपसा केंद्र, ड्रेनेज लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याशिवाय महापालिकेने बापट कॅम्प झोनमधील ड्रेनेज कामांसाठी १३९ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्याचे सादरीकरण झाल्यानंतर काही त्रुटींची पूर्तता करून तांत्रिक मंजुरी झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तत्वतः मंजुरीही दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईत नगरविकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. नगरविकास विभागाचे (दोन) प्रधान सचिव गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील बैठक झाली.

येथील महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प विभागाचे सहायक अभियंता उपजलअभियंता आर. के. पाटील, सल्लागार सचिन गुरव यांनी बैठकीत सहभाग घेतला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी प्रदूषण रोखण्यासाठीच्या या कामांसाठी प्रधान सचिव गोविंदराज यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

Panchganga River
Panchganga River Pollution : पंचगंगा नदीत रसायन मिश्रीत पाणी; प्रदुषण मंडळ निवांत, नागरिकांच्या जिवाशी खेळ

योजनेमध्ये महापालिकेचा ३० टक्के, केंद्राचा ३३.३३ टक्के तर राज्य सरकारचा ३६.६७ टक्के हिस्सा आहे. ‘अमृत-२’ योजनेत यापूर्वी सादर केलेल्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत. त्यामध्ये दुधाळी नाला झोनमध्ये ५७ कोटी, जयंती नाला झोन ५२ कोटी, लाईन बाजार झोनमध्ये ३२ कोटींची विविध कामे होणार आहेत.

त्याशिवाय बापट कॅम्प झोनमध्येच ४६ कोटींचा आणखी एक प्रस्ताव नगरोत्थान योजनेतून पाठवला आहे. त्यात ड्रेनेज लाईनची कामे प्रस्तावित केली आहेत. त्याची तांत्रिक मंजुरी झाली असून, प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेने प्रशासकीय नियोजन पूर्ण केले आहे.

ही होणार कामे

कसबा बावड्यात आणखी एक १५ एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

एमएसईबी बापट कॅम्प, वीटभट्टी नाला, लाईन बाजार कोर्टाजवळ अशी तीन उपसा केंद्रे

कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, विक्रमनगर, सदर बाजार, टेंबलाई, मार्केट यार्ड, शिवाजी विद्यापीठापर्यंत १४८ किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com