Employment Fair : युवकांनो रोजगार संधीचा लाभ घ्या

Rural Employment : आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
Employment Generation
Employment Generation Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 27) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय कांचनवाडी येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

Employment Generation
Rural Employment : एकही सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार नाही ; मंत्री लोढांची ग्वाही

छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर.वराडे, मनोज पांगारकर आदी उपस्थित होते.

Employment Generation
Rural Employment : ग्रामीण भागातील रोजगाराचा कल्पवृक्ष

मंत्री लोढा म्हणाले, की कौशल्य विकास करण्याची संकल्पना आपल्या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविली. उद्योगांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी योग्य ते कौशल्य शिकविण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आयटीआय आणि उद्योजक यांच्या समवेत शासन काम करीत आहे. त्यामुळे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. नामांकीत कंपन्यांचा सहभाग

या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील हर्मन फिनोकेम लि, धुत ट्रांन्समिशन प्रा.लि., ऑस्बॉर्न लिप्पर्ट (ई) प्रा.लि, अलंकार इंजिनीअरींग इक्विपमेंट प्रा.लि., टॉवर मेकॅनिक प्रा.लि., बी.जी. लिन इलेक्ट्रॉनिक्स , वरुण बेवरेजेस लि.पैठण,औरंगाबाद ऑटो अॅन्सीनरी प्रा.लि,अजंठा फार्मा ली. चितेगांव /पैठण ,.किंग फूडटेक प्रा.लि. पैठण ,एक्सेल प्लेसमेंट, व्हीजुअल इन्फोसिस्टम प्रा. लि. , मिनाक्षी अॅग्रो इंडस्ट्री एल एल पी,हिंदूस्तान कंपोजीट लि.,उमासन्स ऑटो कॉम्प प्रा.लि. ओ एम आर बागला आटोमोटीव्ह .लि., फोरेस इंजिनियरींग (ई) प्रा.लि, टिम प्लस एच आर सर्व्हिसेस प्रा.लि., टि. के. प्रेसिजन प्रा.लि., फ्लिपकार्ड होलसेल बेस्टप्राइस वालमार्ट,या नियोक्त्यांकडे १२८३ पदे उपलब्ध आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com