
Jalna News : स्थानिक औद्योगिक कंपन्यामध्ये ज्या रोजगार कौशल्याची मागणी असेल त्या व्यवसायातील प्रशिक्षण देऊन उमेदवारात कौशल्य वाढवून कुशल मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल.
त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने जालना जिल्ह्यातील एकही सुशिक्षित तरुण बेरोजगार राहणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
स्थानिक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकास विभाग आयुक्त लहू माळी, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, देवेश पाथ्रीकर, सहसंचालक पी. टी. देवतळे, डॉ. जकीर पठाण यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, की उद्योजक व शासन एकत्र येऊन काम केले तर निश्चित महाराष्ट्राची भरभराट होईल. याकरिता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्त्वाची आहे. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून ४० कंपन्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नवीन व्यवसायासाठी लागणारी मशिनरी शासनाकडून तातडीने पुरविण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. श्री.
या वेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर,ग उपायुक्त विद्या शितोळे, पी. टी. देवतळे उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका
जनसंवाद/जनता दरबार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंदर्भात बैठक, पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, जिल्हा कौशल्य विभाग आढावा बैठक, संस्था व्यवस्थापन समितीच्या मॅरेथॉन बैठका घेत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.