Farmers Accident Insurance : शेतकरी अपघात विम्याची २०९ प्रकरणे मंजूर

Agriculture Scheme : ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत जिल्ह्यातून गेल्या आर्थिक वर्षात २६४ अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडे दाखल झाले होते.
Farmer Accident Scheme
Farmer Accident SchemeAgrowon

Pune News : ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत जिल्ह्यातून गेल्या आर्थिक वर्षात २६४ अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडे दाखल झाले होते. त्यापैकी २०९ शेतकऱ्यांची विमा प्रकरणे मंजूर करून त्यांना ३ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबीयांस आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ गेल्यावर्षीपासून राबविण्यात येत आहे.

Farmer Accident Scheme
Farmers Accident Insurance : अपघात विमा भरपाई वाटपाला मिळाली गती

कृषी विभागाकडे अपघात विमा योजनेतून दाखल झालेल्या अर्जांपैकी १२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर ४३ अर्ज हे कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत. एकूण आलेल्या अर्जांपैकी २०७ अर्ज मृत्यूप्रकरणी होते. तर दोन अपंगत्वाचे होते. त्यासाठी ४ कोटी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीचे वितरण शेतकऱ्यांना केले असून अजून ६४ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत होतात. घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची स्थिती निर्माण होते.

अशा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक साहाय्य देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ आणली. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे डोळे अथवा हात, पाय निकामी झाल्यास आर्थिक साहाय्य मिळणार आहे.

Farmer Accident Scheme
Farmers Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान २० शेतकऱ्यांना मजूर

आवश्यक कागदपत्रे :

विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना क्र. सहानुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा सिद्ध करणारे कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासह कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय दिलेला लाभ

तालुका---मंजूर प्रकरणे---दिलेली रक्कम (रुपये)

हवेली--२---चार लाख

मावळ---६---दोन लाख

मुळशी---६---आठ लाख

भोर---१३---२२ लाख

वेल्हा---५--६ लाख

आंबेगाव---१९---३२ लाख

खेड---१८---२८ लाख

शिरूर---१८---२८ लाख

जुन्नर---२६---४४ लाख

बारामती---२२---४४ लाख

इंदापूर---२३---४६ लाख

दौंड---३१---५० लाख

पुरंदर---२०---३८ लाख

एकूण---२०९---३ कोटी ५२ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com