Baramati Rainfall: बारामती परिसरात ११७ मिलिमीटर पाऊस

Pre Monsoon Rain: बारामती व परिसरात मागील दोन दिवसांत मुसळधार व सतत पाऊस कोसळत असून, ११७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यातील ही विक्रमी नोंद शेतकऱ्यांसाठी वरदान तर काहींसाठी अडचण ठरतेय.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : बारामती शहर व आसपासच्या परिसरात एका दिवसात तब्बल ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी (ता. २३) दिवसभर व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. तसेच शनिवारी (ता. २४) देखील काहीशा उघडीपी नंतर पुन्हा पाऊस पडला.

साधारणपणे बारामती तालुक्यात मान्सून पूर्व वळवाचा पाऊस मे महिन्यामध्ये होत असतो. मात्र या पावसाचे स्वरूप सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाच्या सरी असे असते. मात्र सध्या मॉन्सूनच्यासारखी वळवाच्या पावसाची संततधार दोन दिवस बारामती तालुक्यामध्ये सुरू आहे. बारामती तालुक्यात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये एवढा सरासरी १५० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, होळ, आदी ठिकाणी २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद या महिन्यामध्ये झाली आहे.

Rain
Pre Monsoon Rain: मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच

दौंड तालुक्यात सलग आठ दिवस झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे व जून महिन्यामध्ये दरवर्षी हजारो एकर उसाची लागवड होते. या सर्व लागवडी सलग पावसामुळे खोळंबल्या आहेत. शुक्रवारपासून (ता. १६) सुरू झालेला पाऊस आजतागायत दररोज पडत आहे.

पावसामुळे मोठ्या पिकांना फायदा झाला आहे. विशेषतः तोडणीस आलेल्या उसाच्या प्रत्येक रोपाच्या मुळाशी पाणी गेल्याने सरासरी ऊस उत्पादन वाढणार आहे. परंतु या पावसाने अनेक शेतीची कामे खोळंबली असल्याची वस्तुस्थिती आहे. विशेषतः अनेक शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीसाठी शेतीची नांगरट केली आहे. परंतु सलग पाऊस असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

Rain
Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीमालाचे नुकसान

त्याचबरोबर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेक पशुपालक शेतकरी चढ्या भावाने उसाचे वाढे खरेदी करत आहेत. दौंड तालुक्यातील अनेक गुराळ उद्योग ठप्प झाले आहेत. या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विवाहाचा मुहूर्त असल्याने अनेक विवाह भर पावसात संपन्न झाल्याची वस्तुस्थिती आहे. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक वरपित्यांनी लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा थोडक्यात आटोपल्या आहेत.

शनिवारी (ता. २४) झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये

बारामती ११७, माळेगाव कॉलनी ५५, वडगाव निंबाळकर ७१, पणदरे ५६, बऱ्हाणपूर ६३, जळगाव कडेपठार ५५, होळ ७०.५, माळेगाव करखना ६८.४, मानाजीनगर ५५, सोनगाव ८३.५, सावंतवाडी ८८, मोढवे ५०, डोर्लेवाडी ७३, गुणवडी ५५, सोमेश्वर कारखाना येथे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तलाव, बंधारे तुडुंब

तालुक्यातील पाझर तलाव, साठवण बंधारे, वळण बंधारे आधी जलसंधारणाची कामे उन्हाळ्यामध्ये झाली होती. आता झालेल्या पावसामुळे या प्रकल्पामधून दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा वाढलेला आहे, अशी माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी शुभम चरवंडे व जलसंधारण अधिकारी केशव जोरी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com