Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीमालाचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : हवेली, शिरूर, सासवड, दौंड, जुन्नर तालुक्यांसह खेड आणि आंबेगाव तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाला, शेतीमाल, मेथी, कोथिंबीर, चारापिके, कांदा, टोमॅटोसह फुले, उन्हाळी बाजरी तसेच भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Pre-Monsoon Rain
Pre-Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता. १८) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर हवेली, शिरूर, दौंड, खेड, मावळ या तालुक्यांत हलक्या सरी पडल्या.

खरिपाच्या तोंडावर पाऊस पडल्याने हा पाऊस दिलासा देत असला तरी उन्हाळी पिकांचे व फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हवेली, शिरूर, सासवड, दौंड, जुन्नर तालुक्यांसह खेड आणि आंबेगाव तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाला, शेतीमाल, मेथी, कोथिंबीर, चारापिके, कांदा, टोमॅटोसह फुले, उन्हाळी बाजरी तसेच भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक भागांत आंबा पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी अतिवृष्टीने शेताचे बांध फुटून शेतातील मातीसुद्धा वाहून गेली.

Pre-Monsoon Rain
Pre-Monsoon Rain : पावसाचा जोर कमी, तरी भीतीचे ढग कायम

काही ठिकाणी साठवलेला कांदा सुद्धा पाण्याच्या लोंढ्यांनी वाहून गेला. उन्हाळी पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी काढलेला नाही. त्यामुळे पीकविमा कंपन्यांकडून भरपाईची शक्यता नाही. तरी राज्य सरकारने या संदर्भात गंभीर दखल घेऊन तत्काळ पंचनामे करावेत. अगोदरच कुठल्याच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

रविवारी दिवसभरात वडगावशेरी येथे १६.० मिलिमीटर पाऊस झाला. तर एनडीए ९.०, हवेली ७.०, हडपसर २.०, राजगुरूनगर १.५, मगरपट्टा १.०, तळेगाव, कुरवंडे, कोरेगाव पार्क, दौंड येथे ०.५ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसेसुद्धा अद्याप मिळालेले नाहीत.

Pre-Monsoon Rain
Pre Monsoon Rain: सावंतवाडी, कणकवली, दोडामार्गात मुसळधार पाऊस

आंबेगाव तालुक्यातील उन्हाळ्यात कोरडी असणारी वेळ नदी मॉन्सूनपूर्व पावसामुळे भरून वाहू लागली. एकीकडे या पावसामुळे शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी अनेक ठिकाणी काही जणांना या पावसामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. पावसामुळे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

शिरूरमधील रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी येथे अचानक मोठे वादळ आणि नंतर पावसाने हजेरी लावली. या वेळी शंकराव लांडगे, आशुतोष लांडगे, दादा शिवले, अनिल चव्हाण, चंद्रशेखर काळे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी पिकांसह आंबा, डाळिंब, अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले.

पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंत प्रमुख केंद्रांवर पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

नारायणगाव २५, शिवाजीनगर २०.२, पाषाण १८.५, डुडूळगाव १६, हवेली ११, राजगुरूनगर, वडगावशेरी ९.५, तळेगाव ढमढेरे ४.५, बल्लाळवाडी ४, कोरेगाव पार्क २.५, हडपसर २.५, बारामती १.५, चिंचवड, पुरंदर, दापोडी १, माळीण, लोणावळा, एनडीए, मगरपट्टा, दौंड ०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com